Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लालबूंद रसाळ कलिंगडावर १ चिमूटभर 'हा' पदार्थ घालून खा, पोट बिघडणे - उलट्या अपचनाचा धोका टळेल...

लालबूंद रसाळ कलिंगडावर १ चिमूटभर 'हा' पदार्थ घालून खा, पोट बिघडणे - उलट्या अपचनाचा धोका टळेल...

why you should add a pinch of salt to watermelon this summer : watermelon with salt benefits : health benefits of watermelon with salt : कलिंगडवर मीठ भुरभुरवून खाण्याचे फायदेच फायदे, राहाल उन्हाळ्यातही कायम फ्रेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2026 15:00 IST2026-05-13T14:49:54+5:302026-05-13T15:00:10+5:30

why you should add a pinch of salt to watermelon this summer : watermelon with salt benefits : health benefits of watermelon with salt : कलिंगडवर मीठ भुरभुरवून खाण्याचे फायदेच फायदे, राहाल उन्हाळ्यातही कायम फ्रेश...

why you should add a pinch of salt to watermelon this summer watermelon with salt benefits health benefits of watermelon with salt | लालबूंद रसाळ कलिंगडावर १ चिमूटभर 'हा' पदार्थ घालून खा, पोट बिघडणे - उलट्या अपचनाचा धोका टळेल...

लालबूंद रसाळ कलिंगडावर १ चिमूटभर 'हा' पदार्थ घालून खा, पोट बिघडणे - उलट्या अपचनाचा धोका टळेल...

उन्हाळ्यात वाढणारे तापमान, सतत येणारा घाम आणि शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे अनेकांना थकवा, अशक्तपणा आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागतो. अशावेळी शरीराला थंडावा आणि ताजेतवानेपणा देण्यासाठी कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. रसाळ, गोड आणि पाण्याने भरलेले कलिंगड केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्ही कधी कलिंगडावर चिमूटभर मीठ टाकून खाल्लं आहे का? अनेकजण ही पद्धत फक्त चव वाढवण्यासाठी वापरतात, मात्र यामागे काही खास आरोग्यदायी फायदेही लपलेले असू शकतात(why you should add a pinch of salt to watermelon this summer).

 रणरणत्या ऊन्हात अंगाची लाहीलाही होत असताना, मनाला आणि ( watermelon with salt benefits) शरीराला थंडावा देणारे सर्वांचं आवडतं फळ म्हणजे कलिंगड. पाण्याचे प्रमाण भरपूर असलेले फळ फक्त आपली तहानच भागवत नाही, तर आपल्यालाला आतून हायड्रेट ठेवण्यासही मदत करते. कलिंगडाची फोड खाताना त्यावर जर चिमूटभर मीठ भुरभुरवले, तर ते फक्त चवीतच भर घालत नाही, तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर ठरते. रणरणतं ऊन, अतोनात येणारा घाम आणि त्यामुळे जाणवणारा थकवा कमी करण्यासाठी कलिंगड आणि मिठाचे हे कॉम्बिनेशन अत्यंत गुणकारी असल्याचे न्यूट्रिशनिस्ट हेतल छेडा (health benefits of watermelon with salt) यांनी सांगितले आहे. ही छोटीशी सवय आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स संतुलित ठेवण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत कशी मदत करते ते पाहूयात. 

उन्हाळ्यात कलिंगड खाताना वरुन चिमूटभर मीठ भुरभुरवून खाण्याचे फायदे...

१. शरीरात इलेक्ट्रोलाईट संतुलन राखण्यास मदत :- न्यूट्रिशनिस्ट हेतल छेडा सांगतात की, कलिंगडामध्ये ९० % पाणी असते आणि काही प्रमाणात पोटॅशियम देखील असते. याचबरोबर मिठात सोडियम भरपूर प्रमाणांत असते. जेव्हा हे सर्व पदार्थ एकत्रित खाल्ले जातात तेव्हा शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन राखले जाते. जे लोक जास्त वेळ उन्हात राहतात किंवा ज्यांना खूप घाम येतो, त्यांच्यासाठी ही पद्धत विशेषतः फायदेशीर ठरू शकते.

ऐन चाळिशीतही येऊ शकतो हार्ट ॲटॅक, नकळत होणाऱ्या ५ चुका आजच बदला-नाहीतर वेळ निघून जायची...

जपानी लोकांच्या ५ सवयी वाढवतात आयुष्य-हार्ट ॲटॅकही टळतो, ठरवलं तर आपल्यालाही जमेल सहज...

२. शरीर आतून हायड्रेट राहाते :- कलिंगडमध्ये आधीच पाण्याचे प्रमाण भरपूर असते, तर मीठ शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करते. जेव्हा आपण कलिंगडवर हलकेच मीठ भुरभुरवून खातो, तेव्हा शरीर हायड्रेट राहते. शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. विशेषतः कडक उन्हाळा आणि उन्हाळ्यात चक्कर येणे, थकवा वाढणे यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी हे कलिंगड - मिठाचे कॉम्बिनेशन अतिशय फायदेशीर ठरु शकते. 

३. हीट स्ट्रोक आणि थकव्यापासून आराम मिळतो :- उन्हाळ्यात कडक ऊन, घाम आणि डिहायड्रेशनमुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. अशावेळी कलिंगडावर मीठ भुरभुरवून खाल्ल्याने शरीराला थंडावा आणि आराम मिळू शकतो. हे कॉम्बिनेशन पाण्याची कमतरता भरून काढते आणि इलेक्ट्रोलाईट संतुलन राखते. याच कारणामुळे हीट स्ट्रोक आणि थकवा या दोन्ही समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हे फायदेशीर मानले जाते.

जाडजूड मांड्या-पोटाचा घेर कमी करतो शेवग्याच्या पानांचा उपाय, वेटलॉससाठी शेवगा असरदार...

४. कलिंगडाचा गोडवा देखील वाढतो :- कलिंगडवर चिमूटभर मीठ शिंपडून खाल्ल्याने त्याचा नैसर्गिक गोडवा अधिक वाढतो. यामुळे जास्तीची साखर न घालताही कलिंगड चवीला गोड लागते. उन्हाळ्यात जर आपण एखादा रिफ्रेशिंग आणि टेस्टी स्नॅक शोधत असाल, तर कलिंगड आणि मीठ हे एक बेस्ट कॉम्बिनेशन ठरू शकते.

५. जास्त प्रमाणात मीठ खाऊ नका :- न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, कलिंगडवर भरभरून मीठ घालून खाणं टाळा. फक्त एक चिमूटभर मीठ भुरभुरवून त्याचा आनंद घ्या. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे पोट फुगणे, तहान लागणे आणि हाय बीपीच्या तक्रारी सतावू शकतात.  त्यामुळे चव आणि आरोग्य या दोन्ही दृष्टीने मिठाचे योग्य प्रमाण आणि संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे.


Web Title : तरबूज पर नमक: गर्मियों में जलयोजन और पाचन के लिए फायदे।

Web Summary : तरबूज पर एक चुटकी नमक डालने से स्वाद बढ़ता है और स्वास्थ्य लाभ मिलते हैं। यह इलेक्ट्रोलाइट्स को संतुलित करता है, निर्जलीकरण को रोकता है, और गर्मियों में हीटस्ट्रोक से बचने में मदद करता है। पोषण विशेषज्ञ हेतल छेड़ा समग्र कल्याण के लिए इस संयोजन की सलाह देते हैं, और सोडियम के स्तर में वृद्धि से बचने के लिए संयम पर जोर देते हैं।

Web Title : Salt on watermelon: Benefits for hydration and digestion this summer.

Web Summary : Adding a pinch of salt to watermelon enhances taste and offers health benefits. It balances electrolytes, prevents dehydration, and helps avoid heatstroke during summer. Nutritionist Hetal Chheda recommends this combination for overall well-being, emphasizing moderation to avoid increased sodium levels.