पंजाबी कुडी शहनाज गिल RCB च्या 'या' क्रिकेटरला करतेय डेट? व्हायरल व्हिडीओ पाहून चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 14:19 IST2026-05-14T14:16:23+5:302026-05-14T14:19:11+5:30

शहनाज rcb च्या कोणत्या क्रिकेटरला करतेय डेट? व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी बांधले अंदाज. जाणून घ्या सविस्तर

Shehnaaz Gill’s appearance at the RCB vs KKR IPL 2026 sparked dating rumours with cricketer Devdutt Padikkal | पंजाबी कुडी शहनाज गिल RCB च्या 'या' क्रिकेटरला करतेय डेट? व्हायरल व्हिडीओ पाहून चर्चांना उधाण

पंजाबी कुडी शहनाज गिल RCB च्या 'या' क्रिकेटरला करतेय डेट? व्हायरल व्हिडीओ पाहून चर्चांना उधाण

अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल सध्या आयपीएल २०२६ (IPL 2026) दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाला पाठिंबा देण्यासाठी रायपूरला पोहोचली होती. यावेळी RCB जर्सी परिधान करुन आलेल्या शहनाज गिलला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, तिच्या या उपस्थितीमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून तिचे नाव क्रिकेटपटू देवदत्त पडिक्कल याच्याशी जोडले जात आहे.

शहनाज गिलची आयपीएलमधील उपस्थिती

शहनाज गिलने नेहमीच आरसीबी (RCB) संघाबद्दल आपले प्रेम व्यक्त केले आहे. एका सोशल मीडिया रीलमध्ये तिने "माझे हृदय RCB साठी धडधडते" असे म्हणत आपला उत्साह व्यक्त केला होता. शहनाज मैदानात दिसल्यानंतर लगेचच एक्स (ट्विटर) सारख्या प्लॅटफॉर्मवर तिच्या आणि देवदत्त पडिक्कलच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या. काही युझर्सनी "शहनाज देवदत्त पडिक्कलसाठी आरसीबीच्या सामन्याला आली आहे का?" असे प्रश्न विचारले. तर काहींनी या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं.





खरं काय?

अर्थात सोशल मीडियावरील या चर्चांवर शहनाज आणि देवदत्त या दोघांनीही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. शहनाज केवळ आरसीबीची चाहती म्हणून तिथे उपस्थित होती आणि देवदत्त पडिक्कल आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे या निव्वळ सोशल मीडियावरील अफवा असल्याचे दिसून येते. त्यामुळे या चर्चांवर शहनाज आणि देवदत्त काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title : शहनाज गिल के RCB समर्थन ने क्रिकेटर के साथ डेटिंग की अफवाहों को जन्म दिया!

Web Summary : शहनाज गिल के RCB का समर्थन करने से क्रिकेटर देवदत्त पडिक्कल के साथ डेटिंग की अटकलें तेज हो गईं। आईपीएल मैच में देखे जाने के बाद सोशल मीडिया पर अफवाहें फैल गईं। हालांकि, न तो गिल और न ही पडिक्कल ने कोई टिप्पणी की है, जिससे पता चलता है कि यह सिर्फ अटकलें हैं।

Web Title : Shehnaaz Gill's RCB Support Sparks Dating Rumors with Cricketer!

Web Summary : Shehnaaz Gill's appearance supporting RCB fueled speculation about dating cricketer Devdutt Padikkal. Social media buzzed with rumors after she was spotted at an IPL match. However, neither Gill nor Padikkal have commented, suggesting it's just speculation.