Cannes 2026: महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट! प्राजक्ता माळी, निवेदिता सराफ आणि अशोक सराफ कान्समध्ये झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 14:03 IST2026-05-16T13:59:43+5:302026-05-16T14:03:22+5:30

महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट समोर आली आहे. कान्समध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रातले लाडके अशोकमामा, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी हे कलाकार झळकणार आहे.

ashok saraf nivedita saraf prajakta mali going to cannes film festival 2026 video viral | Cannes 2026: महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट! प्राजक्ता माळी, निवेदिता सराफ आणि अशोक सराफ कान्समध्ये झळकणार

Cannes 2026: महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट! प्राजक्ता माळी, निवेदिता सराफ आणि अशोक सराफ कान्समध्ये झळकणार

सध्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६'ची जगभरात चर्चा आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडपासून आंतरराष्ट्रीय कलाकार रेड कार्पेटवर हजेरी लावत आहेत. आलिया भट, तारा सुतारिया, हुमा कुरेशी, उर्वशी रौतेला अशा अनेक बॉलिवूडकरांनी कान्समध्ये हजेरी लावली. अशातच महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट समोर आली आहे. कान्समध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रातले लाडके अशोकमामा, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी हे कलाकार झळकणार आहे.

या सर्वांचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अत्यंत उत्साहात आणि आनंदात हे कलाकार फ्रान्ससाठी रवाना झाले आहेत. फ्रान्स देशात 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६' पार पडत आहे. यानिमित्त हे तिघेही कलाकार रेड कार्पेटवर हजेरी लावणार आहेत. त्यांचा व्हिडीओ पाहताच सर्वांना आनंद आणि अभिमान वाटतोय. याशिवाय रेड कार्पेटवर प्रेक्षकांचे लाडके कलाकार कोणत्या लूकमध्ये दिसणार, याचीही उत्कंठा शिगेला आहे. 



पुष्कर जोग कान्समध्ये झळकला

याआधी मराठीतील जबरदस्त अभिनेता पुष्कर जोग कान्समध्ये झळकला. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'साठी पुष्करने खास लूक केला होता. काळ्या रंगाचा सूट, गॉगल असा डॅशिंग लूक करत पुष्कर जोग 'कान्स फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवर उतरला. "७९व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरचा अनुभव खरोखरच भारावून टाकणारा होता. आंतरराष्ट्रीय मीडिया, फ्रेंच पापाराझी, हॉलिवूडचे अभिनेते आणि दिग्दर्शक आपल्या शेजारून चालताना पाहणं म्हणजे अविस्मरणीय क्षण होता. कान्स फेस्टिव्हलमध्ये माझ्या देशाचं भारताचं आणि माझ्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणं ही खूप खास आणि अभिमानाची भावना होती. जय महाराष्ट्र", असं पुष्करने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Web Title : कान्स 2026: मराठी सितारे बिखेरेंगे जलवा, गर्व का क्षण!

Web Summary : अशोक सराफ, निवेदिता सराफ और प्राजक्ता माळी कान्स फिल्म फेस्टिवल 2026 में चमकेंगे। पुष्कर जोग के बाद, तिकड़ी की फ्रांस के लिए रवानगी ने उत्साह जगाया है, प्रशंसक उनके रेड कार्पेट लुक को देखने के लिए उत्सुक हैं। यह महाराष्ट्र के लिए गर्व का क्षण है।

Web Title : Marathi Stars to Shine at Cannes 2026: A Proud Moment!

Web Summary : Ashok Saraf, Nivedita Saraf, and Prajakta Mali are set to grace the Cannes Film Festival 2026. Following Pushkar Jog's appearance, the trio's departure for France has sparked excitement, with fans eager to see their red carpet looks. This marks a proud moment for Maharashtra.