सर्वांनी लग्न करणं गरजेचं आहे का? प्राजक्ता माळीचा सवाल, श्री श्री रविशंकर म्हणाले- "माझ्या बाजूला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:17 IST2026-05-16T16:04:20+5:302026-05-16T16:17:39+5:30

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकतेय. अशातच प्राजक्ताचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकतेय. अशातच प्राजक्ताचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्राजक्ता माळी या व्हिडीओत श्री श्री रविशंकर यांना मनातील एक प्रश्न विचारतेय. त्यावर श्री श्री रविशंकर यांनी दिलेलं उत्तरही अत्यंत महत्वाचं आहे.

श्री श्री रविशंकर त्यांच्या भक्तांसोबत प्रश्न-उत्तरांचं एक सेशन करत असतात. अशाच एका सेशनमध्ये प्राजक्ता माळी बसली होती. तेव्हा तिने श्री श्री रविशंकर यांना विचारलं की, ''लग्न करणं सर्वांसाठी गरजेचं आहे का?'' यावर श्री श्री रविशंकर यांनी मिश्किल पण महत्वाचं उत्तर दिलं.

प्राजक्ताने विचारलेल्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर म्हणाले की, ''तुम्ही हा प्रश्न मला विचारताय? असं असतं तर माझ्या बाजूला आणखी एक खुर्ची लागली असती. आणखी एक सोफा लावावा लागला असता.''

श्री श्री रविशंकर पुढे म्हणाले की, ''लग्न करण्याची अशी काही आवश्यकता नाही. लग्न करुन असो किंवा एकट्याने असो फक्त आनंदी राहिलं पाहिजे.काही लोकांचं काय होतं, ते लग्न करूनही दु:खी असतात आणि एकट्यातही दु:खीच असतात."

''तर काही लोक असेही असतात. जे लग्न न करताही आनंदी राहतात आणि लग्न करूनही आनंदी राहतात. त्यामुळे हे तुम्ही ठरवा. तुम्हाला काय आवडतं. मला वाटतं की आनंदी राहण्याचा पर्याय सर्वांनी निवडायला हवा", असंही श्री श्री रविशंकर यांनी स्पष्ट केलं.

अशाप्रकारे प्राजक्ता आणि श्री श्री रविशंकर यांच्यातील हा प्रश्न-उत्तरांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. प्राजक्ता शूटिंगमधून जसा वेळ मिळेल तशी श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्ससाठी आश्रमात जात असते.