मोसंबीचा ज्यूस कडवट का होतो? या ४ चुका टाळा आणि प्या थंडगार, गोडसर - चविष्ट असा पौष्टिक मोसंबी रस ...

Updated:May 16, 2026 08:30 IST2026-05-16T08:30:00+5:302026-05-16T08:30:02+5:30

Why does mosambi juice turn bitter? Avoid these 4 mistakes and make tasty juice : मोसंबीचा ज्यूस कडू होणार नाही करा या पद्धतीने.

मोसंबीचा ज्यूस कडवट का होतो? या ४ चुका टाळा आणि प्या थंडगार, गोडसर - चविष्ट असा पौष्टिक मोसंबी रस ...

उन्हाळ्यात मोसंबीचा थंडगार रस पिणं अनेकांना आवडतं. हलकी गोडसर चव, ताजेपणा आणि शरीराला मिळणारा फ्रेशनेस यामुळे मोसंबीचा ज्यूस हा अनेक घरांमध्ये नियमित बनवला जातो. पण अनेकदा घरात रस काढल्यानंतर तो कडवट लागतो आणि पूर्ण चवच बिघडते. मोसंबी गोड असतानाही रस कडू का होतो, असा प्रश्न अनेकांना पडतो.

मोसंबीचा ज्यूस कडवट का होतो? या ४ चुका टाळा आणि प्या थंडगार, गोडसर - चविष्ट असा पौष्टिक मोसंबी रस ...

यामागचं एक मोठं कारण म्हणजे मोसंबी सोलताना किंवा कापताना तिच्या सालीचा पांढरा भाग रसात जास्त प्रमाणात मिसळणं. मोसंबीच्या सालीखाली असणारा हा पांढरा भाग चवीला किंचित कडवट असतो. ज्यूस काढताना तो जास्त प्रमाणात रसात गेला तर पूर्ण रसाची चव बदलू शकते.

मोसंबीचा ज्यूस कडवट का होतो? या ४ चुका टाळा आणि प्या थंडगार, गोडसर - चविष्ट असा पौष्टिक मोसंबी रस ...

अनेकदा ज्यूसरमध्ये मोसंबी खूप जोराने किंवा जास्त वेळ फिरवली जाते. त्यामुळे बिया फुटतात आणि त्यातून कडूपणा येऊ शकतो. म्हणूनच मोसंबीचा रस काढताना बिया शक्यतो वेगळ्या कराव्यात आणि ज्यूसरमध्ये फळ जास्त वेळ फिरवू नये.

मोसंबीचा ज्यूस कडवट का होतो? या ४ चुका टाळा आणि प्या थंडगार, गोडसर - चविष्ट असा पौष्टिक मोसंबी रस ...

मोसंबी खूप वेळ आधी कापून ठेवली तरी रसाची चव बदलू शकते. कापलेलं फळ हवेत जास्त वेळ राहिल्यास त्याचा ताजेपणा कमी होतो आणि कधी कधी हलका कडवटपणा वाढतो. त्यामुळे रस बनवण्याच्या वेळीच मोसंबी कापणं अधिक चांगलं ठरतं.

मोसंबीचा ज्यूस कडवट का होतो? या ४ चुका टाळा आणि प्या थंडगार, गोडसर - चविष्ट असा पौष्टिक मोसंबी रस ...

काही वेळा मोसंबी पूर्ण पिकलेली नसल्यासही रस कडसर किंवा आंबट-कडू लागू शकतो. त्यामुळे रसासाठी निवडताना भरलेली, ताजी आणि किंचित मऊ मोसंबी निवडणं फायदेशीर ठरतं.

मोसंबीचा ज्यूस कडवट का होतो? या ४ चुका टाळा आणि प्या थंडगार, गोडसर - चविष्ट असा पौष्टिक मोसंबी रस ...

रस काढल्यानंतर तो लगेच पिणंही महत्त्वाचं असतं. बराच वेळ ठेवलेला रस चवीला बदलू शकतो. विशेषतः उन्हाळ्यात बाहेर ठेवल्यास त्याचा ताजेपणा पटकन कमी होतो.