"आज बाबा असते तर..."; 'पती पत्नी और वो २' चित्रपट पाहून आयुषमान खुरानाच्या आईने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 09:12 IST2026-05-16T09:10:35+5:302026-05-16T09:12:24+5:30

अभिनेता आयुषमान खुराना याचा नवीन चित्रपट 'पती पत्नी और वो २' १५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर आयुषमानच्या आईने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे

Ayushmann Khurrana's mother's reaction after watching the movie 'Pati Patni Aur Woh 2' is in the news | "आज बाबा असते तर..."; 'पती पत्नी और वो २' चित्रपट पाहून आयुषमान खुरानाच्या आईने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

"आज बाबा असते तर..."; 'पती पत्नी और वो २' चित्रपट पाहून आयुषमान खुरानाच्या आईने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

अभिनेता आयुषमान खुराना याचा नवीन चित्रपट 'पती पत्नी और वो २' १५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर आयुषमानच्या आईला तो खूप आवडला आणि त्यांनी भावुक होत त्याच्या दिवंगत बाबांची आठवण काढल्याचे अभिनेत्याने सांगितले.

आयुषमानने इन्स्टाग्रामवर आपल्या आईसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत लिहिले की, "आईने चित्रपट पाहून आशीर्वाद दिला आहे. ती म्हणाली की तुझा चित्रपट खूप चांगला आहे. जर आज तुझे बाबा असते तर त्यांना तुझा खूप अभिमान वाटला असता." आई हा चित्रपट पाहून खूप खूश झाली आणि बऱ्याच दिवसानंतर ती मनमोकळेपणाने हसली, असेही आयुषमानने पुढे नमूद केले.


चित्रपटाबद्दल बोलताना आयुषमानने सांगितले की, तो बालपणापासूनच संजीव कुमार यांच्या 'पती पत्नी और वो' या क्लासिक चित्रपटाचा मोठा चाहता राहिला आहे. लहानपणी तो या चित्रपटातील ‘ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए’ हे गाणे नेहमी गुणगुणायचा आणि याच जुन्या कनेक्शनमुळे त्याने या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल सांगताना त्याने म्हटले की, यात तो एका 'अडचणीत सापडलेल्या पती'च्या भूमिकेत आहे, ज्याची अवस्था पाहून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होईल. 

मुदस्सर अझीझ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात आयुषमान खुरानासोबत सारा अली खान, वामिका गब्बी आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय विजय राज आणि तिग्मांशु धुलिया यांसारख्या दिग्गज कलाकारांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. मात्र, पहिल्या दिवशी या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title : 'पति पत्नी और वो 2' पर आयुष्मान खुराना की मां की प्रतिक्रिया वायरल।

Web Summary : आयुष्मान खुराना की मां ने 'पति पत्नी और वो 2' में उनके प्रदर्शन की सराहना की, कहा कि उनके दिवंगत पिता को गर्व होता। संजीव कुमार क्लासिक की रीमेक में सारा अली खान, वामिका गब्बी और रकुल प्रीत सिंह हैं। यह एक मुश्किल में फंसे पति के बारे में कॉमेडी है।

Web Title : Ayushmann Khurrana's mother's reaction to 'Pati Patni Aur Woh 2' goes viral.

Web Summary : Ayushmann Khurrana's mother praised his performance in 'Pati Patni Aur Woh 2,' saying his late father would have been proud. The film, a remake of the Sanjeev Kumar classic, stars Sara Ali Khan, Wamiqa Gabbi and Rakul Preet Singh. It's a comedy about a husband in trouble.