सेलिब्रिटी असो वा 'Gen Z'... लग्नानंतर अवघ्या काही वर्षांतच का तुटतात नाती? 'या' ५ कारणांमुळे नात्यात येतो दुरावा
Updated:May 15, 2026 21:00 IST2026-05-15T21:00:00+5:302026-05-15T21:00:02+5:30
Top 5 reasons for emotional distance in marriage: Impact of social media on Gen Z relationships and divorce: सेलिब्रिटींचा घटस्फोट , Gen Z पिढीचीही तीच अवस्था, 'या' ५ कारणांमुळे नात्यात येतो कायमचा दुरावा...

लग्न म्हटलं की फक्त दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन कुटुंबांचं, दोन संस्कारांचं आणि अनेक नात्यांचं मिलन असतं. नातं टिकण्यासाठी प्रेमाइतकाच विश्वास, आदर आणि संवाद महत्त्वाचा मानला जातो. मात्र, जेव्हा या गोष्टी कमी होऊ लागतात, तेव्हा सामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणतंही नातं तग धरू शकत नाही.(Why high profile celebrity couples separate)
अलीकडच्या काळात बॉलिवूड, हॉलिवूड तसेच विविध प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने समोर येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, केवळ काही महिन्यांचे किंवा वर्ष-दोन वर्षांचे नातेच नव्हे, तर तब्बल १० ते १२ वर्षे एकत्र संसार केलेली अनेक प्रसिद्ध जोडपीही कायदेशीररित्या वेगळी होताना पाहायला मिळत आहेत. बाहेरून परिपूर्ण दिसणाऱ्या या नात्यांमध्ये नेमकं काय बिघडलं, हा प्रश्न अनेकांना पडतो. (Signs of a toxic relationship and marriage failure)
मात्र, हा बदल फक्त सेलिब्रिटींच्या आयुष्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. आजची Gen Z पिढीदेखील नात्यांबाबत वेगळ्या टप्प्यातून जाताना दिसत आहे. प्रेम, लग्न आणि नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन झपाट्याने बदलत आहे. करिअरची स्पर्धा, वैयक्तिक स्वातंत्र्याला दिलं जाणारं प्राधान्य, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि भावनिक अस्थिरता यामुळे नाती टिकवणं अधिक कठीण होत चाललं आहे.(How to prevent lack of communication in marriage)
सध्या मनोरंजन विश्वात काही सेलिब्रिटींचे घटस्फोट आणि विभक्त होण्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यात अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या घटस्फोट होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हार्दिक पांड्या-नताशा स्टॅन्कोव्हिक त्याआधी क्रिकेटपटू युजवेंद्र चहल- धनश्री वर्माचा घटस्फोट झाला आहे. पण नात्यात दुरावा येण्याचे कारण काय पाहूया.
मनमोकळ करण्यासाठी ऑनलाईन संवाद खूप वाढला आहे. पण यामुळे प्रत्यक्षात संवाद साधता येत नाही. सोशल मीडियावर रिल्स, पोस्ट्स किंवा स्टोरीज शेअर केल्या जातात. पण समोरासमोर बसून मन मोकळं करण्यासाठी वेळ दिला जात नाही. संवाद कमी झाला की गैरसमज वाढतात आणि त्यामुळे नात्यात दुरावा येतो.
सोशल मीडियावर दिसणारं परफेक्ट रिलेशनशिप अनेकांच्या मनात अवास्तव अपेक्षा निर्माण करतं. इतरांच आयुष्य पाहून आपल्या मनात स्वत:च्या नात्याबद्दल असमाधान वाढू लागतं. एकमेकांशी केलेली तुलना नात्यातील आनंद कमी करते.
सध्याची पिढी करिअरला प्राधान्य देते, जे काही प्रमाणात चुकीचे नाही. पण अनेकदा कामाचा ताण, वेळेची कमतरता आणि स्वत:च्या करिअर मागे धावताना नात्यांकडे दुर्लक्ष होते. एकत्र वेळ न घालवल्याने नात्यात हळूहळू दुरावा निर्माण होऊ लागतो.
बरेचदा नात्यात असं होत की स्वतःचं मत महत्त्वाचं वाटणं, मीच बरोबर ही भावना वाढू लागते. त्यामुळे नातं कमकुवत होतं. वैयक्तिक स्पेसची गरज जरी असली तरी त्याचा अर्थ पूर्णपणे दुरावा नसतो, हे समजून घेणं गरजेचं आहे.
Gen Z पिढी ही पुढे जाण्यावर सगळ्यात जास्त फोकस ठेवते. नात्यात अडचणी आल्यानंतर त्यावर काम करण्यापेक्षा अनेकजण ब्रेकअप करण्यावर भर देतात. संयम, समजूतदारपणा आणि तडजोडीची तयारी कमी होत असल्याने नाती लवकर तुटतात.