अधिक मास: स्टीलचंच ताट कशाला? जावयाला नव्या पद्धतीच्या सुंदर तबकात द्या वाण, लेकही होईल खुश
Updated:May 15, 2026 15:36 IST2026-05-15T15:21:05+5:302026-05-15T15:36:28+5:30

अधिक मासाचं वाण देण्यासाठी सासुबाई ताटाची खरेदी आवर्जून करत असतात. कारण त्या ताटात घालूनच जावयाला वाण दिलं जातं.(Adhik Maas 2026)
वाण देण्यासाठी स्टीलचं ताट अनेक जणी घेतात. पण ते वापरात येतंच असं नाही. कारण बहुतांश घरांमध्ये ताटांचा सेट ठरलेला असतो. त्यात ते एकच ताट वेगळं दिसतं. त्यामुळे ते कित्येक जणी वापरत नाहीत. म्हणूनच असं ताट देण्यापेक्षा जर पितळी तबक दिलं तर त्याचा नक्कीच चांगला वापर होऊ शकतो.(brass thali for adhik maas vaan)
अशा पितळी तबकात वाण दिलं तर ते जास्त छानही दिसतं आणि शिवाय पुजेसाठी, औक्षणासाठी, सजावटीसाठी अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापरही होऊ शकतो.
हे एक आणखी सुंदर तबक पाहा. अशा पद्धतीचे कित्येक तबक बाजारात मिळत आहेत.
अधिक मासानिमित्त कित्येक शहरातले भांड्यांचे दुकानं सध्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तबकांनी सजलेले आहेत. कारण या दिवसांत त्याला प्रचंड मागणी असते.
ऑनलाईन शॉपिंग साईटवरही अशा तबकांचे कित्येक नवनविन प्रकार पाहायला मिळतात.
अगदी ४०० रुपयांपासून हे तबक मिळते. जर तबकाचा खर्च वाढत असेल तर कपड्यांचा आहेर किंवा इतर वस्तूंमधला खर्च कमी करून हे तबक घेता येऊ शकते.
सध्या पितळी भांड्यांचा जबरदस्त ट्रेण्ड आला आहे. त्यामुळे अशा परातीमध्येही तुम्ही अधिक मासाचं वाण देऊ शकता.