भिंतीवर कायम पाली फिरतात? हा घरगुती स्प्रे ओटा, खिडकीजवळ मारा, 2 मिनिटांत पळतील पाली
Updated:May 14, 2026 23:25 IST2026-05-14T22:08:10+5:302026-05-14T23:25:58+5:30
How To Remove Lizards From Home : पालींपासून सुटका मिळवण्यासाठी घराची साफ-सफाई करणं खूपच गरजेचं आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत घरात पाली येण्याचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे भितींवर तसंच किचनमध्ये पालीच पाली दिसायला सुरूवात होते. भितीं, स्वयंपाकघर, खिडक्यांच्या आजूबाजूला पाली फिरताना दिसून येतात. (How To Remove Lizards From Home)
पालींना पळवण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. कोणतेही महागडे केमिकल्स किंवा पेस्ट कंट्रोल करण्याची गरज नाही. काही सोपे उपाय तुमचं काम सोपं करतील. (Homemade Spray For Lizards)
एक्सपर्ट्स सांगतात की तीव्र वास पालींना अजिबात आवडत नाही. या वस्तूंचा वापर करून तुम्ही एक सोपा स्प्रे बनवू शकता.
हा स्प्रे तयार करण्यासाठी तुम्हाला व्हाईट व्हिनेगर, लिंबाचा रस, पेपरमिंट तेल आणि काळी मिरी यांसारख्या वस्तूंची आवश्यकता असेल. हे सर्व पदार्थ तुम्हाला किचनमध्ये सहज मिळतील. ज्यामुळे पालींना पळवणं सोपं होईल.
एका स्प्रे बॉटलमध्ये जवळपास १ कप पाणी घ्या. त्यात २ ते ३ चमचे व्हाईट व्हिनेगर मिसळा. नंतर लिंबाचा रस घाला आणि काही थेंब पेपरमिंट तेल मिसळा. पेपरमिंट तेल नसेल तर काळी मिरी पावडरसुद्धा वापरू शकता. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या.
ज्या ठिकाणी पाली जास्त येतात अशा ठिकाणी स्प्रे करा. खिडकी, स्वयंपाकघर, दरवाजे अशा ठिकाणी शिंपडा. ज्यामुळे पाली येणार नाहीत. खाण्यापिण्याच्या पदार्थांवर थेट स्प्रे करू नका.
पालींपासून सुटका मिळवण्यासाठी घराची साफ-सफाई करणं खूपच गरजेचं आहे. पाली अशा ठिकाणी जास्त येतात जिथे कीटक असतात. रात्रभर अन्नपदार्थ उघडे ठेवल्यामुळे, खरकटं ठेवल्यामुळे पाली जास्त प्रमाणात येतात.