कचरा समजून फेकू नका! वापरलेल्या चहा पावडरने घरातील १० कामं होतील चटकन - होईल हजारो रुपयांची बचत...
Updated:May 15, 2026 20:05 IST2026-05-15T20:00:10+5:302026-05-15T20:05:02+5:30
useful hacks of leftover tea leaves : reused tea leaves benefits : tea leaves home hacks : वापरलेली चहा पावडर कचरा नाही तर आहे 'वरदान'; घरातील कठीण कामे होतील झटपट...

reused tea leaves benefits
आपल्यापैकी अनेकांच्या घरात दिवसातून किमान दोन ते तीन वेळा (tea leaves home hacks) तरी चहा तयार केलाच जातो. सकाळची सुरुवात असो, दुपारचा थकवा घालवायचा असो किंवा संध्याकाळच्या गप्पा – चहाशिवाय अनेकांचा दिवसच पूर्ण होत नाही. परंतु चहा बनवल्यानंतर उरलेली वापरलेली चहा पावडर आपण कोणताही विचार न करता थेट कचर्यात फेकून देतो. पण हीच वापरलेली चहा पावडर घरातील अनेक कामांसाठी अतिशय उपयोगी ठरू शकते.
useful hacks of leftover tea leaves
पण तुम्हाला माहित आहे का, ही उरलेली (benefits of leftover tea leaves in kitchen) चहा पावडर म्हणजे स्वयंपाकघरातला (leftover tea leaves kitchen uses) एक उपयुक्त पदार्थ आहे. वापरलेली चहापावडर योग्य प्रकारे साठवली आणि वापरली, तर उरलेली चहा पावडर घरातील अनेक काम अगदी सहजसोपी करू शकते. चहा गाळून गाळणीत उरलेल्या चहा पावडरचे भन्नाट उपयोग पाहूयात.
१. रोपं किंवा झाडांसाठी नैसर्गिक खत :-
वापरलेली चहा पावडर रोपांच्या किंवा झाडांच्या मातीमध्ये मिसळल्यास झाडांना पोषण मिळते आणि झाडांची वाढ चांगली होते. ही पावडर थेट मातीत मिसळून झाडांना घालता येते. यामुळे मातीचा पोत सुधारण्यासाठीही याचा वापर करू शकता.
२. फ्रिजमधील दुर्गंधी :-
वापरलेल्या चहा पावडरच्या मदतीने आपण फ्रिजमधील दुर्गंधी अगदी सहज दूर करू शकतो. यासाठी चहा पावडर चांगली वाळवून घ्या आणि नंतर एका वाटीत भरून ती फ्रिजमध्ये ठेवा. याचा वापर आपण नैसर्गिक 'एअर फ्रेशनर' म्हणून करू शकता. फ्रिजसोबतच शू रॅक किंवा कचरापेटीतील दुर्गंधी कमी करण्यासाठी सुकवलेली चहा पावडर उपयोगी ठरते.
३. केसांना चमक येण्यासाठी :-
कचरा समजून फेकून दिली जाणारी चहा पावडर केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. वापरलेली चहा पावडर पुन्हा एकदा पाण्यात उकळून घ्या आणि ते पाणी थंड झाल्यावर त्याने केस धुवा. यामुळे केस मऊसूत आणि चमकदार होतात. आपण केसांसाठी हा उपाय रोजच्या रोज करू शकता.
४. काचेच्या भांड्यांची स्वच्छता :-
घरातील काचेच्या भांड्यांची चमक कमी झाली असेल आणि तेलाचे डाग धुतल्यानंतरही जात नसतील, तर त्यांची स्वच्छता करण्यासाठी उरलेल्या चहा पावडरचा वापर करू शकता. यासाठी, वापरलेली चहा पावडर पुन्हा पाण्यात उकळायची, मग या पाण्यात लिक्विड डिश वॉश आणि लिंबाचा रस मिसळून एक द्रावण तयार करा. या द्रावणाने काचेच्या भांड्यांची स्वच्छता करू शकता. यामुळे काचेच्या भांड्यांची चमक परत येईल आणि तेलाचे डागही निघून जातील.
५. नॉन-स्टिक भांड्यांवरील चिकटपणा साफ करा :-
उरलेल्या चहा पावडरचा वापर करून तुम्ही नॉन-स्टिक भांड्यांवर साचलेला चिकटपणा देखील स्वच्छ करू शकता. यासाठी, वापरलेली चहा पावडर पाण्यात घालून उकळा आणि त्यात थोडे व्हिनेगर घाला. हे पाणी नॉन-स्टिक भांड्यांवर थोडा वेळ घालून ठेवा. त्यानंतर मऊ स्क्रबरला डिशवॉश लावून भांडी स्वच्छ करा. यामुळे पॅनवरील चिकटपणा आणि उग्र वास दोन्ही निघून जातील. तसेच, यामुळे नॉन-स्टिक पॅनचे कोटिंग सुरक्षित राहण्यास मदत होते.
६. कटिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी :-
जर लाकडी कटिंग बोर्डवरून कांद्याचा किंवा लसणाचा उग्र वास येत असेल, तर वापरलेली चहा पावडर घेऊन ती बोर्डवर चांगली घासा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे बोर्डवरील दुर्गंधी पूर्णपणे निघून जाईल.
७. डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी :-
थंड केलेले टी बॅग्स किंवा चहा पावडरचे पाणी डोळ्यांवर ठेवल्यास आराम मिळू शकतो.
८. मुंग्या दूर ठेवण्यासाठी :-
घराच्या कोपऱ्यात चहा पावडर टाकल्यास मुंग्या कमी येण्यास मदत होते.
९. लाकडी फर्निचरची चकाकी वाढवण्यासाठी :-
घरातील लाकडी फर्निचर जुने आणि निस्तेज दिसू लागले असेल, तर वापरलेली चहा पावडर त्यासाठी नॅचरल पॉलिश म्हणून काम करू शकते. वापरलेली चहा पावडर पुन्हा एकदा पाण्यात नीट उकळून घ्या. हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर एक मऊ सुती कापड या पाण्यात भिजवून त्याद्वारे लाकडी फर्निचर, कपाट किंवा टेबल पुसून घ्या. चहामध्ये असलेल्या 'टॅनिन' मुळे लाकडाला नैसर्गिक गडद रंग आणि एक प्रकारची चमक मिळते. यामुळे फर्निचर नव्यासारखे दिसू लागते.
१०. किचन सिंक आणि कचऱ्याच्या डब्याची दुर्गंधी :-
सिंकच्या नळीतून येणारा वास घालवण्यासाठी चहा पावडर कोमट पाण्यात टाकून ते पाणी सिंकमध्ये ओता. याचबरोबर, कचऱ्याचा डबा स्वच्छ धुतल्यानंतर तळाला थोडी वाळलेली चहा पावडर टाका, जेणेकरून दुर्गंधी पसरणार नाही.