कुठे गायब झाला 'शोले'तील गब्बरचा मुलगा? 'राजा की आएगी बारात'मधून केलेला डेब्यू, ८ सिनेमे करून इंडस्ट्रीतून घेतला काढता पाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:22 IST2026-05-16T15:33:46+5:302026-05-16T16:22:51+5:30
बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकाचा मुलगा तरीही बहरली नाही कारकीर्द, राणी मुखर्जीसोबत केलंय काम, आता काय करतो?

अभिनयाच्या चंदेरी दुनियेत प्रत्येकजण आपलं नाव कमावण्यासाठी कमी धडपड करत असतो.त्याचबरोबर अनेक स्टारकिड्स देखील बॉलिवूडमध्ये स्वत:चं नशीब आजमवण्यासाठी येतात. पण त्यापैकी काहीजण यशस्वी होतात तर काहीजणांना अपेक्षित असं यश मिळत नाही.

चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकृतींमधून काम केल्यानंतर अनेक कलाकार इंडस्ट्रीपासून दुरावले. मात्र,आजही त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे त्यांची चर्चा होताना दिसते. यापैकीच एक नाव म्हणजे शादाब खान.

अभिनेता शादाब खान हा अभिनेते अमजद खान यांचा मुलगा आहे. १९९६ मध्ये आलेल्या राजा की आएगी बारात या चित्रपटातून त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने राणी मुखर्जीसोबत शादाबने स्क्रिन शेअर केली होती.

राजा की आएगी बारात या चित्रपटात त्याने राणीच्या पतीची भूमिका साकारली होती. यानंतर शादाब खानने अनेक चित्रपटांमधून काम केलं. मात्र, त्याची कारकिर्द म्हणावी तशी बहरली नाही.

शादाब खान याने वडील अमजद खान यांच्या पावलांवर पाऊल ठेवत इंडस्ट्रीत एन्ट्री केली. पण, तो फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. करिअरमध्ये फक्त ८ चित्रपटांमध्ये काम करून त्याने सिनेमांमध्ये काम करणं बंद केलं.

एकंदरीत, त्याची चित्रपट कारकीर्द पूर्णपणे फ्लॉप झाली. शादाब शेवटचा रोमियो अकबर वॉल्टरमध्ये दिसला होता. त्यानंतर आता तो पूर्णवेळ लेखक म्हणून काम करतो.

शादाबने वडील अमजद खान यांचे चरित्र लिहिले, जे अमिताभ बच्चन यांनी लॉन्च केले. या शिवाय त्याच्या शांती मेमोरियल आणि मर्डर इन बॉलिवूड या दोन कादंबऱ्यांना काहीसं यश मिळाले. इतकंच नाहीतर त्याने काही चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या आहेत.

















