उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर आपल्या शरीरात अनेक बदल घडत असतात. सतत येणारा घाम, शरीरातून बाहेर पडणारे पाणी आणि वाढलेली उष्णता यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. अशावेळी आपल्या लक्षात येते की इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात लघवी कमी प्रमाणात होते. काहींना याबद्दल चिंता वाटते, तर काहीजण याकडे दुर्लक्ष करतात(why urinate less in summer).
उन्हाळ्यात शरीरात होणाऱ्या अनेक बदलांपैकी (less urine in hot weather) एक महत्त्वाचा बदल म्हणजे 'लघवीचे प्रमाण कमी होणे'. अनेकदा लघवीला कमी होऊ लागली की आपल्याला वाटते आपण कमी पाणी पितोय किंवा एखादी शारीरिक समस्या तर नाही ना ? पण थांबा! यामागे आपल्या शरीराची( why do you urinate less during summer) एक अत्यंत चांगली 'मॅजिकल' सिस्टीम' काम करत असते. उन्हाळ्यात लघवी कमी प्रमाणात होण्याचं नेमकं कारणं काय ते पाहूयात.
यामध्ये किडनीची सर्वात महत्वाची भूमिका असते ?
हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटलचे ज्येष्ठ सल्लागार आणि नेफ्रोलॉजिस्ट डॉ. राजशेखर चक्रवर्ती मदारसु यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत या बदलामागे शरीराची स्वतःला सुरक्षित ठेवण्याची पद्धत असते असं सांगितलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, आपल्या शरीरातील पाणी आणि खनिजांचे संतुलन राखण्याचे मुख्य काम किडनी करते. जेव्हा उन्हाळा किंवा घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागते, तेव्हा किडनी लघवीला अधिक 'कॉन्सन्ट्रेटेड' (घट्ट/गडद) बनवते. या प्रक्रियेदरम्यान शरीरात एक विशेष हार्मोन ॲक्टिव्ह होते, ज्याला 'अँटी-डाययुरेटिक हार्मोन' (ADH) असे म्हणतात. हे हार्मोन किडनीला विशिष्ट संकेत देते की, शरीरातील जास्तीत जास्त पाणी पुन्हा शोषून घेतले जावे. शरीरातील पाण्याचा साठा टिकवून ठेवण्याच्या या प्रयत्नामुळेच लघवीचे प्रमाण कमी होते.
वाफ घ्यावी की बर्फाचा शेक, त्वचेसाठी नेमकं काय बेस्ट? सोपा उपाय करताच त्वचा दिसेल स्वच्छ, चमकदार...
डिहायड्रेशनमुळे समस्या कशी वाढते?
जर एखादी व्यक्ती उन्हाळ्यात पुरेसे पाणी पित नसेल, तर शरीरात डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता) सुरू होते. जेव्हा शरीराला पाण्याची कमतरता भासते, तेव्हा ते उरलेले पाणी वाचवण्यासाठी अधिक प्रयत्न करते, परिणामी लघवीचे प्रमाण अजूनच घटते. तज्ज्ञांच्या मते, कडक उष्णतेच्या लाटेदरम्यान (Heatwave) अनेक लोकांमध्ये लघवीचे प्रमाण ३० ते ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते.
ही समस्या चिंतेची कधी ठरू शकते ?
लघवी कमी होणे ही जरी नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी डॉक्टरांच्या मते लघवी अतिशय कमी होऊन त्यासोबत खालील लक्षणे दिसू लागल्यास काळजी घेणे गरजेचे असते.
१. गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे
२. चक्कर येणे
३. तोंड सारखे कोरडे पडणे
४. अतिशय थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे
५. तीव्र डोकेदुखी होणे
६. लघवी करताना जळजळ होणे
हे संकेत शरीरातील पाण्याची गंभीर कमतरता किंवा किडनीवर पडणारा ताण किती आहे हे दाखवण्यास मदत करतात. अशावेळी घरगुती उपायांसोबतच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
२१ दिवस पपई 'या' पद्धतीने खा! ढेरी होईल कमी, फॅटी लिव्हर आणि वेटलॉसही होईल झटपट, व्हाल सुपरफिट...
या आजारांचा धोका...
जर शरीरात दीर्घकाळ डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता) राहिली, तर केवळ थकवाच नाही तर अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने खालील समस्यांचा समावेश होतो.
१. किडनी स्टोन :- शरीरात पाणी कमी असल्याने लघवीतील क्षार जमा होऊन खडा होण्याची शक्यता वाढते.
२. यूरिन इन्फेक्शन (UTI) :- लघवीचे प्रमाण कमी झाल्यामुळे बॅक्टेरिया शरीबाहेर फेकले जात नाहीत, परिणामी मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो.
३. लो ब्लड प्रेशर :- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने रक्ताचे प्रमाणही कमी होते, ज्यामुळे रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो.
त्यामुळे उन्हाळ्यात शरीराने दिलेले डिहायड्रेशनच्या संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड कसे ठेवावे?
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवायचे असेल, तर खालील उपाय करा.
१. दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्या :- तहान लागण्याची वाट न पाहता ठराविक अंतराने पाणी पिण्याची सवय लावा.
२. इलेक्ट्रोलाईट ड्रिंक्स प्या :- जास्त घाम येत असेल, तर नुसते पाणी न पिता लिंबू पाणी, ओआरएस (ORS) किंवा मीठ-साखर पाणी घ्या, ज्यामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण टिकून राहील.
३. शहाळे पाणी आणि ताजी फळे :- आहारात शहाळ पाणी, टरबूज, काकडी आणि संत्री यांसारख्या पाणीदार फळांचा समावेश करा.
४. कॅफिन आणि अल्कोहोल टाळा :- जास्त चहा, कॉफी किंवा मद्यपानामुळे शरीरातील पाणी वेगाने कमी होते, त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या.
५. उन्हात जाणे टाळा :- दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर पडणे टाळा.
६. लघवीच्या रंगावर लक्ष ठेवा :- डॉक्टरांच्या मते, तुमच्या लघवीचा रंग फिकट असेल तर त्याचे अर्थ तुमचे शरीर व्यवस्थित हायड्रेटेड आहे.
