आपली त्वचा चमकदार आणि निरोगी त्वचा होण्यासाठी अनेकजणी वेगवेगळे स्किनकेअर उपाय करतात. आपल्यापैकी काहीजणी चेहऱ्यावर बर्फाच्या पाण्याचा शेक घेतात, तर काहीजण त्वचा स्वच्छ आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी गरम पाण्याची वाफ घेतात. सोशल मिडियावरही हे दोन्ही उपाय खूपच ट्रेंडमध्ये आहेत. मात्र त्वचेसाठी नेमकं काय जास्त फायदेशीर ठरतं, असा प्रश्न अनेकींना पडतो(face icing or face steaming which is best for the skin).
अनेकदा आपण केवळ कुणाचे तरी ऐकून किंवा सोशल मीडियावरील ट्रेंड पाहून चेहऱ्यावर प्रयोग करतो. मात्र, वाफ घेण्याचे आणि बर्फाचा शेक देण्याचे परिणाम पूर्णपणे वेगळे असतात. जिथे वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्रे उघडली जाऊन खोलवर स्वच्छता होते, तिथेच बर्फाचा शेक दिल्याने चेहऱ्यावरील सूज कमी होऊन त्वचा घट्ट होण्यास मदत होते. पण प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्यामुळे योग्य उपाय निवडणं खूप महत्त्वाचं ठरतं. स्किन केअर रुटीनमध्ये 'फेस आयसिंग' (बर्फाचा शेक) आणि 'फेस स्टीमिंग' (वाफ घेणे) या दोन्ही गोष्टी चुकीच्या पद्धतीने केल्यास त्वचेला होणारे नुकसानही सोसावे लागू शकते. त्वचेची काळजी (face icing vs face steaming) घेण्यासाठी या दोन्ही पद्धतींचे फायदे, तोटे आणि आपल्या स्किन टाईपसाठी नेमके काय योग्य आहे ते पाहूयात.
फेस आयसिंग म्हणजे नेमकं काय?
'फेस आयसिंग' म्हणजे थोडक्यात, चेहऱ्यावर बर्फ लावण्याच्या प्रक्रियेलाच फेस आयसिंग असे म्हणतात. यासाठी आईस क्यूब, आईस रोलर किंवा अत्यंत थंड पाण्याचा वापर केला जातो.
फेस आयसिंग (बर्फाचा शेक) कधी करावा ?
जर आपल्याला झटपट आणि इन्स्टंट परिणाम हवा असेल, तर फेस आयसिंग करणं फायदेशीर ठरते.
१. त्वचेवर सूज असल्यास :- डोळ्यांखालील पफीनेस आणि चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी बर्फ सर्वोत्तम आहे.
२. इन्स्टंट ग्लो हवा असल्यास :- रक्ताभिसरण सुधारल्यामुळे त्वचेवर लगेच चमक येते.
३. मुरुमांचा त्रास असल्यास :- मुरुम कमी करण्यासाठी आणि ओपन पोर्सना घट्ट करण्यासाठी याचा वापर करावा.
४. मेकअप करण्यापूर्वी :- मेकअप दीर्घकाळ टिकावा यासाठी मेकअप करण्यापूर्वी बर्फाचा शेक घेणे फायदेशीर ठरते.
घराचा कोपरा- उशी-चादरी सर्वत्र केस दिसतात? मेथ्या-भात-खाबरेल तेलाचा ‘हा’ उपाय आजच करा, लगेच...
फेस स्टीमिंग म्हणजे नेमकं काय?
चेहऱ्याला गरम पाण्याची वाफ देणे, ज्यामुळे त्वचेची आतून खोलवर स्वच्छता होऊ शकते, यालाच 'फेस स्टीमिंग' असे म्हणतात. त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी अनेकजणी प्रामुख्याने या पद्धतीचा वापर करतात.
फेस स्टीमिंग (वाफ घेणे) कधी घ्यावी ?
जर आपल्याला त्वचेची खोलवर स्वच्छता करायची असेल, तर वाफ घेणे फायदेशीर ठरते.
१. डीप क्लिनिंगसाठी :- चेहऱ्यावरील छिद्रे (Pores) उघडून आतील घाण साफ करण्यासाठी वाफ घेणे आवश्यक आहे.
२. ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स :- जर तुम्हाला नाकावर किंवा चेहऱ्यावर ब्लॅकहेड्सचा त्रास असेल, तर वाफ घेतल्याने ते सहज निघण्यास मदत होते.
३. कोरड्या त्वचेसाठी :- वाफ घेतल्याने त्वचेला आवश्यक हायड्रेशन मिळते आणि नैसर्गिक ग्लो वाढतो.
दोघांपैकी त्वचेसाठी सगळ्यात बेस्ट काय ?
त्वचेसाठी या दोन्ही पद्धतींचा योग्य क्रमाने वापर करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते. तुम्ही 'आधी वाफ आणि नंतर बर्फाचा शेक' असे दोन्ही उपाय करू शकता.
१. आधी वाफ घ्या :- यामुळे छिद्रे उघडतील आणि त्वचा आतून स्वच्छ होईल.
२. फेसपॅक किंवा सीरम लावा :- वाफ घेतल्यामुळे स्किन केअर प्रॉडक्ट्स त्वचेत नीट शोषून घेते.
३. शेवटी बर्फ लावा :- स्वच्छतेनंतर उघडी राहिलेली छिद्रे पुन्हा बंद करण्यासाठी बर्फाचा शेक द्या.
