एकही अभिनेत्री नसलेला चित्रपट! २० कोटी बजेट अन् कमावले १२ पटीने जास्त, ओटीटीवर कुठे बघाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 16:28 IST2026-05-14T16:23:55+5:302026-05-14T16:28:43+5:30
११ मित्रांची स्टोरी प्रेक्षकांना भावली! बॉक्स ऑफिसवर 'हा' सिनेमा सर्वांपेक्षा ठरला सरस, 'या' प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध

एकही अभिनेत्री नसलेला चित्रपट! २० कोटी बजेट अन् कमावले १२ पटीने जास्त, ओटीटीवर कुठे बघाल?
OTT Cinema: चित्रपट म्हटलं की, एक हिरो आणि एक हिरोइन असावी लागते. मग ती विशिष्ट चौकटीत बसवली जाते. गाणी,सुंदर संवाद, संघर्ष नाट्यमयता... वगैरे. परंतु २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला असाच एक सिनेमा ज्यात कोणतीही अभिनेत्री नसतानाही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. मैत्रीवर आधारित असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला.हा चित्रपट पाहून प्रेक्षक तर आनंदी झालेच आणि त्याची कमाई देखील खूप झाली. या चित्रपटाचं नाव आहे 'मंजुम्मेल बॉईज'
'मंजुम्मेल बॉईज' या एक मळ्यालम चित्रपट आहे.अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तिकिट बारीवर २४१ कोटीं रुपये इतकी कमाई केली.विशेष म्हणजे चित्रपटात एकही अभिनेत्री नाही. हा चित्रपट २२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला. शोबिन शाहीर, श्रीनाथ भासी, बालू वर्गीस, गणपती एस. पोडुवल, लाल ज्युनियर, दीपक परंबोल, अभिराम राधाकृष्णन, अरुण कुरियन, खालिद रहमान, चंदू सलीम कुमार आणि विष्णू रेघू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन चिदंबरम यांचं आहे.
कथानक
'मंजुम्मेल बॉईज' हा २००६ साली तामिळनाडूच्या कोडाईकनाल येथे घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित एक सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपट आहे. यात केरळमधील मंजुम्मेल येथील ११ मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. हे सगळे मित्र केरळच्या मंजुम्मेल कस्बेला ट्रिपसाठी प्लॅन बनवतात. गुणा लेणी या नावाने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी ते पोहोचतात. त्यादरम्यान,सुभाष नावाचा त्यांचा एक मित्र एका खोल दरीत पडतो. तेव्हा या मित्रांसमोर मोठं आव्हान उभं राहतं. त्याचे मित्र त्याला वाचवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतात. हा चित्रपट खऱ्या मैत्रीची कथा दर्शवतो.हा चित्रपट 'JioHotstar' वर उपलब्ध आहे.