घराची स्वच्छता करताना आपण हॉल, किचन आणि बेडरूमकडे जेवढे लक्ष देतो, तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त लक्ष बाथरुम आणि कमोडच्या स्वच्छतेकडे देणे अधिक गरजेचे असते. कारण बाथरुम ही अशी जागा आहे जिथे बॅक्टेरिया सर्वात वेगाने वाढतात. बाथरूम आणि टॉयलेटची स्वच्छता राखणे हे घरातील स्वच्छतेचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानले जाते. मात्र कितीही साफसफाई केली तरी अनेकदा कमोडमध्ये डाग, दुर्गंधी किंवा पिवळसर थर साचल्याचे दिसते. बाथरुममधील कमोडवर बरेचदा काळे - पिवळे डाग जास्त प्रमाणात दिसतात, असे डाग कित्येकदा एका धुण्यात जात नाहीत. कमोडवरील असे पिवळे - चिकट डाग घालवण्यासाठी आपल्याला वारंवार कमोड धुवून स्वच्छ करावा लागतो. अशावेळी फारशी मेहेनत न घेता किंवा कमी वेळात कमोड स्वच्छ करण्यासाठी काहीतरी साधासोपा उपाय असावा असे मनोमन वाटते(benefits of putting ice cubes in commode).
कमोड स्वच्छ ठेवण्याच्या घरगुती उपायांमध्ये, एक भन्नाट ट्रिक म्हणजे कमोडमध्ये बर्फाचे तुकडे टाकणे. ऐकायला विचित्र वाटत असलं तरी आठवड्यातून एकदा हा उपाय केल्याने कमोड (why should ice cubes be put in toilet once a week) चटकन स्वच्छ होतो. आजकाल सोशल मीडियावर 'आईस क्यूब हॅक' (Ice Cube Hack) खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये टॉयलेट बाऊलमध्ये बर्फाचे तुकडे टाकून स्वच्छता केली जाते. महागड्या टॉयलेट क्लीनरवर पाण्यासारखे पैसे खर्च करण्यापेक्षा, फ्रीजरमधील (ice cubes in commode cleaning trick) बर्फ कमोडच्या स्वच्छतेसाठी कसा फायदेशीर ठरु शकतो ते पाहूयात.
कमोड स्वच्छ करण्यासाठी व्हायरल 'आईस क्यूब हॅक'...
कमोड स्वच्छ करण्यासाठी बर्फाचा हा उपाय करणे अत्यंत सोपे आहे. सर्वात आधी फ्रीजरमधून साधारण दोन ते चार कप बर्फाचे तुकडे काढा आणि ते थेट कमोडमध्ये टाका. त्यानंतर लगेचच बर्फावर टॉयलेट क्लीनर किंवा व्हिनेगर ओता. बर्फामुळे क्लीनर तिथेच थांबून राहील, ज्यामुळे ते कमोडला व्यवस्थित चिकटेल. क्लीनरला आपले काम करण्यासाठी हे मिश्रण ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या. शेवटी, फक्त फ्लश करा.
टॉयलेट साफ करताना सर्वात मोठी समस्या ही असते की, लिक्विड क्लीनर टाकताच ते घसरून थेट खाली नालीत वाहून जाते. यामुळे क्लीनरला डागांवर काम करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही टॉयलेट बाऊलमध्ये दोन कप बर्फाचे तुकडे टाकता, तेव्हा ते पाण्यावर एका थरासारखे (Shelf) जमा होतात. आता जेव्हा तुम्ही त्यावर क्लीनर टाकाल, तेव्हा ते बर्फावर टिकून राहील आणि टॉयलेटच्या भिंतींना जास्त वेळ चिकटून बसेल. यामुळे क्लीनर वाया जाणार नाही आणि कमोड होईल नव्यासारखे मिळेल स्वच्छ.
लालबूंद रसाळ कलिंगडावर १ चिमूटभर ‘ही’ गोष्ट घालून खा, पोट बिघडणे-उलट्या अपचनाचा धोका टळेल...
बर्फाच्या तुकड्यांच्या कडा या काहीशा कडक आणि टोकदार असतात. जेव्हा आपण बर्फ टाकल्यानंतर फ्लश करतो, तेव्हा पाण्याचा वेग आणि हे तुकडे कमोडच्या आत वेगाने फिरतात. हे एखाद्या नैसर्गिक स्क्रबरप्रमाणे काम करते. बर्फाच्या या घर्षणामुळे टॉयलेटच्या पृष्ठभागावर साचलेली हलकी घाण, शेवाळ आणि क्षारांचे थर खरवडून निघण्यास मदत होते.
घाम साचून काळे झालेत अंडरआर्म्स? ५ मिनिटांचे २ उपाय - मी त्वचा दिसेल उजळ...
टॉयलेटमध्ये अनेकदा ओलाव्यामुळे एका विशिष्ट प्रकारचा उग्र वास येऊ लागतो. बर्फाचा हा उपाय ही दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे. जेव्हा बर्फ हळूहळू वितळतो आणि थंड पाण्यासोबत फ्लश होतो, तेव्हा तो टॉयलेटचा पृष्ठभाग अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करतो. जर बर्फासोबत थोडा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर टाकला, तर त्यामुळे टॉयलेटमध्ये सुवास येतो आणि दुर्गंधी पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते.
कितीही महागडं टॉयलेट क्लीनर वापरलं तरी ते डागांवर टिकण्याऐवजी लगेच वाहून जातं...अशावेळी कमोडमध्ये मूठभर बर्फाचे तुकडे टाकल्याने क्लीनर तिथेच टिकून राहतं आणि फ्लश करताना निर्माण होणारी घर्षणशक्ती चिवट डागांना सहज काढून टाकते. विनामेहनत कमोड आरशासारखं चकचकीत करायचं असेल, तर हा 'आईस क्यूब हॅक' एकदा नक्की करून पाहा. हा देसी जुगाड तुमची मेहनत आणि पैसे दोन्ही वाचवणारा आहे.
