Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > घाम साचून काळे झालेत अंडरआर्म्स? ५ मिनिटांचे २ उपाय - त्वचा दिसेल उजळ...

घाम साचून काळे झालेत अंडरआर्म्स? ५ मिनिटांचे २ उपाय - त्वचा दिसेल उजळ...

how to remove dark underarms naturally : remedies for black underarms : उन्हाळ्यात घामामुळे अंडरआर्म्स झालेत काळेकुट्ट? घरीच करा २ साधेसोपे घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2026 10:53 IST2026-05-13T10:37:01+5:302026-05-13T10:53:37+5:30

how to remove dark underarms naturally : remedies for black underarms : उन्हाळ्यात घामामुळे अंडरआर्म्स झालेत काळेकुट्ट? घरीच करा २ साधेसोपे घरगुती उपाय...

how to remove dark underarms naturally remedies for black underarms underarm whitening home remedy | घाम साचून काळे झालेत अंडरआर्म्स? ५ मिनिटांचे २ उपाय - त्वचा दिसेल उजळ...

घाम साचून काळे झालेत अंडरआर्म्स? ५ मिनिटांचे २ उपाय - त्वचा दिसेल उजळ...

उन्हाळ्याचा तडाखा वाढला की घामाच्या समस्याही वाढतात. उन्हाळा सुरू होताच घाम, चिकटपणा आणि त्वचेच्या अनेक समस्या वाढू लागतात. अनेकदा अति घाम आल्यामुळे आणि तो त्वचेवर तसाच साचून राहिल्यामुळे अंडरआर्म्सची त्वचा काळीकुट्ट पडू लागते. यामुळे आवडते स्लीव्हलेस कपडे घालताना आपल्याला संकोच वाटतो. अनेक महागड्या क्रीम्स वापरूनही हा काळपटपणा जात नाही, उलट त्यातील केमिकल्समुळे त्वचा अधिकच खराब होते. विशेषतः अंडरआर्म्समध्ये सतत घाम साचल्यामुळे त्वचा काळवंडणे, दुर्गंधी येणे आणि रफनेस वाढणे यासारख्या समस्या अनेकांना जाणवतात. याशिवाय सतत शेव्हिंग करणे, केमिकलयुक्त डिओड्रंट्स वापरणे आणि त्वचेची योग्य स्वच्छता न ठेवणे यामुळेही काखेतील काळपटपणा वाढू शकतो(how to remove dark underarms naturally).

उन्हाळ्याच्या दिवसांत विशेषतः अंडरआर्म्समध्ये बराच वेळ साचून राहतो, तेव्हा अनेक समस्यांना सुरुवात होते. काखेतील त्वचा ही अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते. घाम साचल्यामुळे तिथे बॅक्टेरियांची वाढ होते, ज्यामुळे केवळ दुर्गंधीच येत नाही, तर हळूहळू ती त्वचा काळीकुट्ट पडू लागते. अनेकदा आपण हा काळपटपणा (how to use turmeric for dark underarms) लपवण्यासाठी महागडे डिओडोरंट्स, रोल-ओन्स किंवा केमिकल असलेल्या फेअरनेस क्रीम्स वापरतो. परंतु यातील केमिकल्स त्वचेच्या छिद्रांना बंद करतात, ज्यामुळे काखेतील काळपटपणा (underarm whitening home remedy) कमी होण्याऐवजी अधिकच गडद होत जातो. अशावेळी काही सोपे घरगुती उपाय नियमितपणे केल्यास अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यास मदत मिळू शकते. काखेतील काळपटपणा दूर करण्यासाठी (remedies for black underarms) काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरु शकतात. 

अंडरआर्म्स काळे पडण्यामागची मुख्य कारणे... 

काखेतील त्वचा काळी पडण्यामागे केवळ घामच नाही, तर इतरही अनेक महत्त्वाची कारणे असू शकतात. 

१.  वारंवार रेझर वापरल्यामुळे किंवा वॅक्सिंग केल्यामुळे त्वचेवर जळजळ होते आणि ती काळी पडू लागते.

२.  उन्हाळ्यात जास्त घाम येणे आणि त्वचेवर त्वचा घासली गेल्यामुळे काळपटपणा वाढतो.

३. परफ्यूम किंवा डिओडोरंटमधील प्रखर रसायनांमुळे नाजूक त्वचेवर परिणाम होऊन ती काळवंडते.

चहा आणि कॉफीने पांढरे केस काळे करण्याचा ‘हा’ घ्या फुकट उपाय - तुमच्या मैत्रिणीही विचारतील सिक्रेट काय ?

४. शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेकदा त्वचेच्या रंगात बदल होतो.

५. ओलावा आणि घामामुळे काखेत बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) होण्याची शक्यता असते, ज्यामुळे त्वचा काळी पडते.

६. जास्त घट्ट कपड्यांमुळे त्वचेला हवा मिळत नाही आणि सततच्या घर्षणामुळे काखेतील भाग काळा होतो.

७. काही विशिष्ट आजार किंवा वैद्यकीय कारणांमुळेही त्वचेचा रंग बदलू शकतो.

अंडरआर्म्सचा काळपटपणा कमी करण्यास खास उपाय... 

उपाय १ :- हळद ही नैसर्गिकरीत्या त्वचा उजळण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. त्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील इन्फेक्शन कमी करतात आणि काळे डाग फिके पाडण्यास मदत करतात.

साहित्य :- 

१. हळद :- २ चिमूट

२. दूध :- १ चमचा

३. मध :- १ चमचा

कसे वापरावे?

१. वरील सर्व साहित्य एका वाटीत एकत्र करून त्याची जाडसर पेस्ट तयार करा.
२. ही तयार पेस्ट आपल्या अंडरआर्म्सवर व्यवस्थित लावा.
३. पेस्ट लावल्यानंतर ती १० ते १५ मिनिटांसाठी तशीच सुकू द्या.
४. शेवटी कोमट पाण्याचा वापर करून त्वचा स्वच्छ धुवून घ्या.

जिनिलिया देशमुखच्या हातातले मंगळसूत्र ब्रेसलेट पाहिले, सुंदर स्टायलिश दागिना! पाहा १० सध्याच्या ट्रेंडी डिझाइन्स...

उपाय २ :- हळदीमध्ये जंतूनाशक गुणधर्म असतात, तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे नैसर्गिकरित्या त्वचा उजळवण्यास आणि डेड स्किन काढून टाकण्यास मदत करते.

साहित्य :- 

१. हळद :- २ चिमूट

२. दही :- १ चमचा

मॉलच्या आरशात सुंदर दिसणारे कपडे घरी आल्यावर वेगळेच दिसतात ना..? बदलतो पूर्ण लूक, कारणं...

कसे वापरावे?

१. एका लहान वाटीत हळद आणि दही एकत्र करून त्याची मऊ पेस्ट तयार करा.
२. ही पेस्ट तुमच्या अंडरआर्म्सवर लावा आणि १५ ते २० मिनिटे तशीच राहू द्या.
३. त्यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून टाका.
४. सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय नक्की करा.
५. याच्या नियमित वापरामुळे हळूहळू काखेतील काळपटपणा कमी होऊन त्वचा उजळू लागते.

Web Title : काले अंडरआर्म्स? 5 मिनट में पाएं निखरी त्वचा, ये हैं उपाय।

Web Summary : पसीने, शेविंग या डिओडोरेंट से अंडरआर्म्स काले हो जाते हैं। हल्दी और दही जैसे घरेलू नुस्खों से रंगत निखारें। नियमित उपयोग से त्वचा में निखार आता है।

Web Title : Dark underarms? 5-minute home remedies for brighter, lighter skin.

Web Summary : Dark underarms are often caused by sweat, shaving, or deodorants. Combat discoloration with simple home remedies like turmeric and yogurt. Regular use lightens skin.