1 / 14फॅशन आणि ज्वेलरीच्या बदलत्या ट्रेंडनुसार आता पारंपरिक मंगळसूत्रालाही मॉडर्न टच मिळताना दिसत आहे. पूर्वी फक्त गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र आता स्टायलिश ब्रेसलेटच्या रूपात महिलांच्या पसंतीस उतरत आहे. खास करून तरुणी आणि नववधूंमध्ये मंगळसूत्र ब्रेसलेटची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पारंपरिक काळ्या मण्यांसोबत गोल्ड, डायमंड आणि मिनिमल डिझाईन्सचा सुंदर संगम या ब्रेसलेटमध्ये पाहायला मिळतो. हे ब्रेसलेट्स रोजच्या वापरासाठीही आरामदायक आणि ट्रेंडी वाटतात. 2 / 14काळ बदलला, फॅशन बदलली आणि त्याचबरोबर मंगळसूत्र घालण्याच्या पद्धतीतही एक कमालीचा बदल पाहायला मिळत आहे. एकेकाळी फक्त गळ्यात शोभणारे मंगळसूत्र, आजच्या बदलत्या काळात महिलांच्या पसंतीस उतरून थेट हातात 'ब्रेसलेट'च्या रूपात घालून मिरवण्याचा ट्रेंड प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 3 / 14चक्क सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया रितेश देशमुख हिला देखील या मंगळसूत्र ब्रेसलेटच्या ट्रेंडची भुरळ पडली आहे. रितेशचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा राजा शिवाजी सध्या फारच सुपरहिट ठरत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी जिनिलियाने पारंपरिक दागिन्यांसोबत नऊवारी साडी नेसत हातात रितेशच्या नावाचे इंग्रजी आद्याक्षर 'R' असणारे कस्टमाईजस ब्रेसलेट घातले होते. 4 / 14पारंपारिक मंगळसूत्राला एक नवा, स्टायलिश टच देण्याचा विचार करत असाल तर सध्या काही प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या काही निवडक आणि अतिशय सुंदर मंगळसूत्र ब्रेसलेट डिझाईन्स पाहूयात. 5 / 14१. सिंपल आणि एलिगंट लूक आवडणाऱ्या महिलांसाठी हे डिझाईन परफेक्ट ठरू शकते. छोट्या काळ्या मण्यांसोबत नाजूक गोल्ड चेन याला क्लासी लूक देते.6 / 14२. ब्लॅक बीड्स आणि छोट्या डायमंड पेंडंटचा कॉम्बिनेशन असलेले हे ब्रेसलेट पार्टीवेअर आणि ट्रेडिशनल दोन्ही लूकसाठी सुंदर दिसते.7 / 14३. हार्ट शेप असलेले मंगळसूत्र ब्रेसलेट नवविवाहित महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हे डिझाईन रोमँटिक आणि ट्रेंडी वाटते.8 / 14४. पारंपरिक गोल्डऐवजी रोज गोल्ड फिनिशमध्ये तयार केलेले ब्रेसलेट सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हे वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही आउटफिट्सवर सूट होते.9 / 14५. दोन ते तीन लेयर असलेले हे मल्टीलेअर ब्रेसलेट हातात खूप रॉयल आणि स्टायलिश दिसते. हे डिझाईन साडी आणि लेहंग्यावर अधिक खुलून दिसते.10 / 14६. मोत्यांसोबत काळ्या मण्यांचे कॉम्बिनेशन असलेले ब्रेसलेट खूपच सॉफ्ट आणि एलिगंट लूक देते. सोन्याच्या साखळीत काळ्या मण्यांसोबत नाजूक सफेद मोती जोडलेले असतात. हे ब्रेसलेट साडी किंवा कुर्ता यांसारख्या पारंपारिक कपड्यांवर अत्यंत क्लासिक दिसते.11 / 14७. काही महिलांना नाव किंवा इनिशियल्स असलेले पर्सनलाइज्ड ब्रेसलेट आवडतात. अशा प्रकारचे डिझाईन्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. आजकाल अनेक महिला आपल्या जोडीदाराचे नाव किंवा नावाचे पहिले अक्षर (Initial) मंगळसूत्र ब्रेसलेटच्या मध्यभागी बनवून घेतात. यामुळे त्याला एक 'पर्सनल टच' मिळतो.12 / 14८. ब्रेसलेट घेताना त्याला आपण आपल्या सोयीनुसार ऍडजस्टेबल कडी तयार करून घेऊ शकतो, यामुळे हाताच्या आकारानुसार तुम्हाला ते सहजपणे सैल किंवा घट्ट करता येईल.13 / 14९. असेच काही सुंदर, नाजूक मंगळसूत्र ब्रेसलेट डिझाईन्स तुमच्या सगळ्याच आऊटफिट्सवर अगदी परफेक्ट मॅच होतील. 14 / 14१०. मंगळसूत्र ब्रेसलेटच्या वेगवेगळ्या डिझाईन्स प्रत्येकीच्या पसंतीस उतरतील अशाच आहेत.