Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Shopping > मॉलच्या आरशात सुंदर दिसणारे कपडे घरी आल्यावर वेगळेच दिसतात ना..? बदलतो पूर्ण लूक, कारणं...

मॉलच्या आरशात सुंदर दिसणारे कपडे घरी आल्यावर वेगळेच दिसतात ना..? बदलतो पूर्ण लूक, कारणं...

why clothes look better in trial room : clothes look perfect in trial room : why trial room mirrors are different : मॉलमध्ये आवडलेला किंवा छान वाटणारा ड्रेस घरी येताच बोअरिंग किंवा फिका का वाटतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2026 14:57 IST2026-05-11T14:50:14+5:302026-05-11T14:57:54+5:30

why clothes look better in trial room : clothes look perfect in trial room : why trial room mirrors are different : मॉलमध्ये आवडलेला किंवा छान वाटणारा ड्रेस घरी येताच बोअरिंग किंवा फिका का वाटतो ?

why clothes look better in trial room clothes look perfect in trial room why trial room mirrors are different | मॉलच्या आरशात सुंदर दिसणारे कपडे घरी आल्यावर वेगळेच दिसतात ना..? बदलतो पूर्ण लूक, कारणं...

मॉलच्या आरशात सुंदर दिसणारे कपडे घरी आल्यावर वेगळेच दिसतात ना..? बदलतो पूर्ण लूक, कारणं...

आपण जेव्हा मॉलमध्ये नवीन कपडे खरेदी करण्यासाठी जातो, तेव्हा ट्रायल रूममध्ये कपडे घालून पाहिल्यावर ते खूपच आकर्षक आणि परफेक्ट दिसतात. त्या कपड्यांचा रंग, फिटिंग आणि संपूर्ण लूक आपल्याला इतका आवडतो की आपण लगेच ते खरेदी करण्याचा निर्णय घेतो. पण अनेकदा हेच कपडे घरी आणून पुन्हा घातल्यानंतर त्यांचा लूक तितका खास वाटत नाही. कपड्यांचा रंग वेगळा दिसतो, फिटिंग बदलल्यासारखं वाटतं किंवा ट्रायल रूममध्ये दिसलेला ग्लॅमरस इफेक्ट गायब झालेला जाणवतो. असे नेमके का होते?(why clothes look better in trial room).

मॉलच्या ट्रायल रूममध्ये आपण जेव्हा एखादा ड्रेस आरशात बघतो, तेव्हा आपण अक्षरशः एखाद्या सेलिब्रिटीसारखे चमकत असतो. परफेक्ट फिटिंग, उठावदार रंग आणि तो जबरदस्त कॉन्फिडन्स! पण हाच ड्रेस जेव्हा आपण विकत घेऊन घरी येतो आणि घरच्या साध्या आरशात घालून बघतो, तेव्हा तो स्पेशल सेलिब्रिटी लूक कुठेतरी हरवलेला असतो. रंग फिका वाटू लागतो किंवा ट्रायल रूममध्ये दिसणारा तो लूक गायब झालेला असतो. कधी प्रश्न पडलाय का, की एकाच ड्रेसचा लूक ट्रायल रूममध्ये आणि घरी इतका वेगळा का दिसतो? हा निव्वळ आपल्या मनाचा खेळ नाही, तर यामागे मॉल्सनी वापरलेलं एक (clothes look perfect in trial room) खास टेक्निक आणि मार्केटिंग तंत्र आहे. लाइटच्या अँगलपासून ते आरशाच्या डिझाईनपर्यंत अशा काही गोष्टी तिथे जाणीवपूर्वक केल्या जातात, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कपडा स्वतःवर परफेक्टच वाटतो. ट्रायल रूममधली ती 'मॅजिक' नेमकी काय असते ( why trial room mirrors are different) आणि घरी आल्यावर तुमचा लूक का बदलतो, यामागची कारणं नेमकी काय आहेत ते पाहूयात. 

ट्रायल रूममध्ये कपडे छान दिसण्यामागची कारणे कोणती ?

१. लायटिंगचा खरा खेळ (Lighting Game)  :- मॉलच्या ट्रायल रूममध्ये कधीतरी बारकाईने लक्ष द्या, तिथे सहसा 'वॉर्म लायटिंग' (Warm Lighting) चा वापर केला जातो. हे दिवे थेट वरून न येता बाजूने किंवा आरशाच्या मागून येतात. याचा सर्वात मोठा फायदा असा होतो की, तुमच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर पडणाऱ्या सावल्या (Shadows) कमी होतात. यामुळे आपली त्वचा अधिक चमकदार (Glowing) दिसते आणि कपड्यांचा रंग अत्यंत उठावदार व 'लक्झरी' वाटू लागतो. मात्र, जेव्हा आपण घरी येऊन साध्या ट्यूबलाईट किंवा पांढऱ्या प्रकाशात तेच कपडे घालतो, तेव्हा त्यातील फरक स्पष्टपणे जाणवू लागतो. 

२. आरशांची सेटिंग (Mirror Placement) :- मॉल आणि स्टोअर्समध्ये वापरले जाणारे आरसे हे काही साधेसुधे आरसे नसतात. अनेकदा हे आरसे थोडेसे 'टिल्ट' (एका बाजूला झुकलेले) करून लावले जातात. जेव्हा आरसा खालच्या बाजूने थोडा बाहेर काढलेला असतो, तेव्हा तुमची उंची थोडी जास्त वाटते आणि तुम्ही अधिक सडपातळ दिसता. याशिवाय, आजकाल अनेक ब्रँड्स 'स्लिमिंग मिरर्स' (Slimming Mirrors) वापरतात, जे तुम्हाला प्रत्यक्षापेक्षा ५ ते १० टक्के जास्त फिट दाखवतात. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात इतके स्मार्ट पाहता, तेव्हा तुमचे मेंदू लगेच तो कपडा खरेदी करण्याचा सिग्नल देतो.

एकच प्लाझो स्टाईल ८ - उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंगमुळे ट्रिक, लूक दिसेल लय भारी...

जपानी लोकांच्या ५ सवयी वाढवतात आयुष्य-हार्ट ॲटॅकही टळतो, ठरवलं तर आपल्यालाही जमेल सहज...

३. स्वच्छता आणि वातावरण (Ambiance) :- मॉलमधील ट्रायल रूम नेहमी अतिशय स्वच्छ आणि सुगंधी ठेवल्या जातात. तिथले तापमान देखील एकदम परफेक्ट (AC ची थंडगार हवा) असते. जेव्हा आपण बाहेरची उष्णता आणि गोंधळातून येऊन त्या शांत आणि थंड वातावरणात स्वतःला एका दर्जेदार आरशासमोर पाहता, तेव्हा तुमचा 'फील गुड' फॅक्टर' वाढतो. या मानसिक स्थितीत आपल्याला साधे कपडेही खूप छान वाटू लागतात.

४. घरचा आरसा आणि 'रिॲलिटी चेक' :- मॉलमध्ये आपलं लक्ष फक्त त्या नवीन कपड्यावर असतं, पण घरी आल्यावर आपण आपल्या रोजच्याच वातावरणात असतो. घरचा आरसा सपाट असतो आणि लाईट सरळ डोक्यावर असते. यामुळे अंगावरच्या कपड्याच्या सुरकुत्या, पोटाचा भाग किंवा रंगातील त्रुटी स्पष्ट दिसू लागतात.

पुढच्या वेळी खरेदी करताना, कपडा कसा दिसतोय हे पाहण्यासाठी ट्रायल रूमच्या बाहेर येऊन नैसर्गिक प्रकाशात किंवा स्टोअरच्या मुख्य भागातील आरशात स्वतःला नक्की तपासा!

Web Title : मॉल के शीशे में कपड़े अच्छे, घर पर क्यों नहीं?

Web Summary : मॉल के ट्रायल रूम में लाइटिंग, झुके हुए शीशे और माहौल का कमाल होता है। ये तकनीकें कपड़ों को घर की तुलना में बेहतर दिखाती हैं, जिससे फिट और रंग की कमियां छिप जाती हैं।

Web Title : Why clothes look better in mall mirrors but not at home?

Web Summary : Mall trial rooms use lighting, tilted mirrors, and ambiance tricks. These techniques make clothes appear more flattering than they are at home, revealing fit and color imperfections.