आलिया भट्टने कान्समध्ये दाखवला नथीचा नखरा, पाहा भारतीय पारंपरिक नथींचे वेगवेगळे प्रकार

Updated:May 16, 2026 16:08 IST2026-05-16T15:55:50+5:302026-05-16T16:08:28+5:30

आलिया भट्टने कान्समध्ये दाखवला नथीचा नखरा, पाहा भारतीय पारंपरिक नथींचे वेगवेगळे प्रकार

नुकत्याच झालेल्या कान्स महोत्सवात आलियाने एक अतिशय सुंदर पेहराव केला हाेता आणि तिच्या त्या पोशाखाला चार चाँद लावण्याचं काम केलं ते तिने घातलेल्या नोजपीनने. सिल्वर रंगाची तिची नोजपिन तिचं सौंदर्य तर खुलविणारी होतीच. पण त्या सोबतच नथीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली...

आलिया भट्टने कान्समध्ये दाखवला नथीचा नखरा, पाहा भारतीय पारंपरिक नथींचे वेगवेगळे प्रकार

आलियाने घातलेली ही नथ पारंपरिक दाक्षिणात्य नथ म्हणून ओळखली जाते. मुक्कुथी असं तिचं नाव. ही नथ सोन्यामध्ये घडविलेली असते आणि मोती, कुंदन यासह वेगवेगळी रत्नं लावून ती सजवली जाते.

आलिया भट्टने कान्समध्ये दाखवला नथीचा नखरा, पाहा भारतीय पारंपरिक नथींचे वेगवेगळे प्रकार

जेनेलिया डिसुझाचा 'राजा शिवाजी' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये तिच्या पारंपरिक वेशभुषेची खूप चर्चा होत आहे. जेनेलिया या चित्रपटात अतिशय मोहक दिसली हे खरंच.. पण तिचे दागिनेही खूप देखणे होते. यामध्ये तिने घातलेल्या वेगवेगळ्या नथ हा देखील खूप सुंदर होत्या. या मराठमोळ्या नथील पेशवाई नथ असंही म्हणतात.

आलिया भट्टने कान्समध्ये दाखवला नथीचा नखरा, पाहा भारतीय पारंपरिक नथींचे वेगवेगळे प्रकार

ही आहे राजस्थानची पारंपरिक नथ. जोधा अकबर, पद्मावत यासारख्या चित्रपटांमधून या नथीचे खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळाले होते. या नथीला राजपुती किंवा राजपुताना नथ असंही म्हणतात. तसेच नाथुरी म्हणूनही ती ओळखली जाते.

आलिया भट्टने कान्समध्ये दाखवला नथीचा नखरा, पाहा भारतीय पारंपरिक नथींचे वेगवेगळे प्रकार

ही आहे पंजाबची शिकारपुरी नथ. नाकात गोल नथणी आणि तिला लावलेली एक साखळी. ही साखळी केसांमध्ये अडकवली जाते. पंजाबी लग्नांमध्ये तर नववधुचा पोशाख या दागिन्याशिवाय अपूर्ण असतो.

आलिया भट्टने कान्समध्ये दाखवला नथीचा नखरा, पाहा भारतीय पारंपरिक नथींचे वेगवेगळे प्रकार

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागातल्या महिलांचं सौंदर्य खुलविणारी ही नथ म्हणजे पहाडी नथ. हिला कुमाओनी किंवा तेहरी नथ म्हणूनही ओळखलं जातं.

आलिया भट्टने कान्समध्ये दाखवला नथीचा नखरा, पाहा भारतीय पारंपरिक नथींचे वेगवेगळे प्रकार

या नथीला पोलकी नथ म्हणतात. हल्ली अशा प्रकारच्या नथीचा ट्रेण्ड असून कित्येक नववधू ती आवर्जून घालतात.