- मयूर पठाडेहो, आहेच तुमचं मूल उद्धट, एकारलेलं आणि स्वत:तच रममाण असलेलं.. चारचौघांत तुम्ही नाही बोलणार आपल्याच मुलाबद्दल असं. त्याचं कौतुक कराल, पण घरी आल्यावर कदाचित त्याला दोन रट्टेही ओढणार किंवा त्याची खरडपट्टीही काढणार..आपलं मूल जसजसं मोठं होत चाललंय, तसतसं ते जास्त उद्धट, एकारलेलं आणि ‘माझं तेच आणि तेवढंच खरं’ असं वागणारं होऊ लागलंय, याची तुम्हाला कल्पना येऊ लागली असेलच. त्यामुळे तुमची स्वत:वर आपल्या मुलावरही जास्तच चिडचिड होऊ लागली असेल हेही तितकंच खरं आहे..पण मग आहे काय यावर उपाय?तुम्ही सगळं काही करून पाहिलंत, प्रेमानं अंजारून, गोंजारुन झालंय, धाकदपटशा दाखवून झालाय, वेळप्रसंगी दोन रट्टेही मारुन झालेत.. तरीही आपलं पोर आहे तसंच. अगदी निगरगट्ट. आताशा तर ते बेडरपणे आपल्या नजरेला नजरही द्यायला लागलंय. करा तुम्हाला काय करायचं ते.. मी माझा हेका सोडणार नाही..का होतात मुलं अशी एकारलेली, हट्टी, उद्धट?..१- आपली मुलं ही शेवटी ‘आपली’च असतात हे लक्षात घेतलं म्हणजे अनेक गोष्टींची उत्तरं मिळतात.२- बघा आपल्या स्वत:कडे. आपण आहोत का हट्टी, एकारलेले. ‘हम करे सो कायदा’ म्हणणारे? घरात फक्त तुमचा आणि तुमचाच हुकुम चालतो का? मग तुमचं मूल चार पावलं तुमच्या पुढे जाणार हे लक्षात ठेवा..३- तुमच्या मलांशी तुमचे संबंध कसे आहेत तेही एकदा लक्षात घ्या. किती वेळ देता तुम्ही आपल्या मुलांना? किती त्याला समजून घेता? तशी संधी मिळते त्याला?.. नसेल मिळत तर ते असंच एकारलेपणाकडे जाऊ शकतं.४- पालक म्हणून तुमच्यात आणि त्याच्यात जर नात्याचे हळूवार बंध फारसे फुललेच नाहीत, आणि या प्रेमापोटी ते आसुसलेलं असेल, तर आत्मकेंद्रीपणाकडे ते झुकू शकतं.५- पालकांचं पुरेसं प्रेम न मिळाल्यामुळे अशी मुलं स्वत:ला कायम असुरक्षित समजत असतात. आपण कमजोर नाहीत, हे दाखवण्याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे त्यांचं उद्धट, निगरगट्ट वाटणं..६- त्यासाठी पालक म्हणून आपण स्वत: तर संयम राखला पाहिजेच, पण त्या संयमाची समंजस रुजुवातही आपण आपल्या लाडक्या मुलांवर केली पाहिजे.७- मूल जर चिडलेलं असेल, काहीही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नसेल, तर अगोदर त्याला शांत होऊ द्या, मगच उपदेशांचे डोस त्याला पाजा.८- घरात येताजाता आपण पोराची कानशिलं लाल करणार असू, तर बाहेरही ते तेच करण्याचाच प्रयत्न करील.. हेही आपल्याला माहीत असू द्या..
तुमचं मूल असं उद्धट, एकारलेलं आणि हट्टी का झालंय?..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 17:42 IST
आपली मुलं शेवटी ‘आपली’च असतात. त्यांना आपल्यापेक्षा चांगलं कोण समजून घेऊ शकतो?
तुमचं मूल असं उद्धट, एकारलेलं आणि हट्टी का झालंय?..
ठळक मुद्देमुलांशी कसे आहेत तुमचे संबंध? मुलांसाठी किती वेळ आहे तुमच्याकडे?त्यांना किती समजून घेता?मुलं स्वत:ला जर असुरक्षित समजत असतील, तर त्याचा बाह्य परिणाम त्यांच्या निगरगट्टपणात दिसू शकतो.