शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

नवरा बायकोच्या भांडणाचं मुख्य कारण नेमकं काय असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 15:46 IST

नवरा-बायकोच्या भांडणाला कारण लागत नाही तरी सर्वाधिक भांडणं कशावरुन होतात हे पाहिलं तर कळते, आंटेदाल की किंमत!

ठळक मुद्देअमेरिकेतला सर्व्हे म्हणतो, जोडप्यांची पैशाची गणितं चुकलेली आहेत.

नवरा-बायकोत भांडणं होतात, चिक्कार होतात, रोज होतात. ही जगभरची गोष्ट. कुणी त्याला अपवाद नाही. लग्नानंतर  भांडय़ाला भांडं लागणारच म्हणत अशा भांडणाकडे दुर्लक्ष करत संसाराचा गाडा हाकला जातोच. हळूहळू ही भांडणं सवयीचीही होतात. कुठल्या विषयावरुन भांडण होणार याचा परस्परांना हळूहळू अंदाजही येऊ लागतो. पण तुम्हाला काय वाटतं, कुठल्या विषयावरुन नवराबायकोत सर्वाधिक भांडणं होत असतील? म्हणजे भांडणाचा मुख्य विषय कोणता? कुणी म्हणेल नवरा बायकोच्या भांडणाला कारण कुठं लागतं, ते कशावरुनही होऊ शकतं. ते कितीही खरं असलं तरी अलिकडेच झालेला एक सव्र्हे म्हणतो की नवराबायकोची सर्वाधिक भांडणं किंवा भांडणाचं मुख्य कारण हे पैसा आणि पैशाचे हिशेब हेच असतं!

अर्थात आपला अभ्यास आपल्याकडे भारतात झालेला नाही. आपल्याकडे नवरा बायको कशावरुन भांडतात हे शोधुन काढणं जास्त इंटरेस्टिंग ठरावं. पण हा अभ्यास झालाय अमेरिकेत. cashlorette  या वेबसाईटने केलेल्या अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं की अमेरिकन कपल्सपैकी 60%  कपल्स हे पैशावरुन भांडतात.

त्यातही पैसे खर्च करण्याच्या सवयीवरुन आणि पैशाचे हिशेब न देण्यावरुन ही भांडणं जास्त पेटलेली दिसतात. इतकी की याच कारणावरुन सर्वाधिक घटस्फोटही होताना दिसतात.

आणि भांडणांची सुरुवात कशानं होते?

त्यातलं मुख्य कारण म्हणजे, एकजण खूप पैसे उधळतो. खूप शॉपिंग, खूप खर्च करतो.

दुसरं कारण म्हणजे दोघं कमावते असतील तर एकजण दुसर्‍याच्या सगळ्या पैशांवर हक्क गाजवतो. पैशाच्या वाटणीवरुन भांडणं होतात.

तिसरं म्हणजे बिलं कुणी भरायची? घरातली,विजेची, हॉटेलची बिलं कुणी भरायची यावरुन भांडणं होतात.

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरखर्चाच्या पैशाचा हिशेब देत नाही, हिशेब मागितला की भांडण ठरलेलं.

यासार्‍या गोष्टींवरुन भांडणं तर आपल्याकडेही होतात. खरंतर मनी मॅनेजमेण्ट नाही, हिशेब जमत नाहीत यावरुन होणारी ही भांडणं संसार मोडेर्पयत जाणं वाईट आहे.

मॅरेज कौन्सिलिंगमध्ये यापुढे या ही गोष्टींच्या समावेश करावा लागेल, हे उघड आहे.