आपण प्रेमात पडतो म्हणजे नेमकं काय होतं? आपल्याला भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण का वाटायला लागतं?तो वयाचा परिणाम तर असतोच, पण आपण जसजसं वयात येऊ लागतो, तसतसं आपल्या शरीरात जसे बदल होतात, तसेच आपल्या शरीरात वेगवेगळ्या हार्माेन्सचीही निर्मिती होते. निरनिराळ्या रसायनांची निर्मिती होते. मुलं आणि मुली दोघांमध्येही या रसायनांची निर्मिती होते.मुलांच्या शरीरात इस्ट्रोजेन नावाचं हार्माेन तयार होतं. त्यामुळे आवाज घोगरा होतो. उंचीत झपाट्यानं वाढ होते. लैंगिक जाणिवा वाढीला लागतात.मुलींच्या शरीरात इस्ट्रोजि नावाचं हार्मोन तयार होतं. त्यामुळे शरीराला गोलाई येते. मासिक पाळी सुरू होते. पुरुषांच्या नजरा खेचून घ्याव्यात, त्यांना आपल्याकडे आकर्षित करावं असं वाटायला लागतं.हे सारं नैसर्गिक आहे, पण या वयात असतं ते फक्त भिन्नलिंगी व्यक्तीबद्दलचं आकर्षण. ते प्रत्येकातच आढळतं. त्यात गैर काहीच नाही, पण हे शारीरिक आकर्षण म्हणजेच प्रेम, असंही नाही. बºयाचदा या वयातली मुलं या बाह्य रुपाला आणि आकर्षणालाच भाळतात आणि आपलं त्या व्यक्तीवर प्रेम आहे असं त्यांना वाटायला लागतं. त्याच व्यक्तीशी लग्न करायचं असा निर्णयही ते घेऊन टाकतात. गफलत होते ती इथेच.त्यामुळे लग्नाचा निर्णय घेताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.
लग्नापूर्वी काय विचार कराल? काय काळजी घ्याल?१) आपल्या संभाव्य जोडीदाराच्या गुणांबरोबरच मर्यादाही समजून घ्या.२) लग्नाचा निर्णय घेताना संभाव्य संधीचा आणि धोक्यांचा विचार करा.३) एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटणारी ओढ आणि आकर्षण हे शरीरातल्या रसायनांचा परिणाम आहे हे समजून घ्या.४) सर्वांचा विरोध पत्करून लग्न करताना येणाºया परिस्थितीला कसं सामोरं जाता येईल ते आधीच ठरवा.५) पळून जाऊन लग्न करण्यापूर्वी घरातील काही माणसांना तरी विश्वासात घेऊन आपली निवड योग्य आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करा.६) लग्न करताना स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेमध्ये असणारा फरक समजून घ्या. लग्नानंतर कोणकोणत्या अॅडजेस्टमेंट, तडजोडी करायला लागतील त्यांचा विचार करून तशी तयारी ठेवा.७) कामसुख, जोडीदार, लग्न या व्यतिरिक्त मानवी आयुष्यात खूप काही महत्त्वाचं असतं याचं भान ठेवा.