शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत: ‘शिस्तीत’ राहाल, तरच मुलांनाही लागेल ‘वळण’..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 18:34 IST

मुलांना वळण लावणं अगदीच सोपं, पण तितकंच अवघडही..

ठळक मुद्देपालकांनी अगोदर स्वत:ला शिस्त लावण्याची गरज.अनुकरणातून आणि प्रेमानंच मुलांना शिस्त लागू शकते.योग्य तीच गोष्ट मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे.

- मयूर पठाडेकसं लावायचं मुलांना वळण? कशी लावायची त्यांना शिस्त?.. घराघरातला हा प्रश्न आणि घराघरातले पालक त्यामुळे वैतागलेले. सुजाण पालकत्त्वाचे धडे तसे साºयांनीच गिरवलेले. तरीही त्यांना प्रश्न पडतो.. अरे, एवढी काळजी आम्ही घेतोय, तरी आपलं मूल असं का? का नाही लागत त्याला वळत..कधीतरी मग पालकांचाही संयम सुटतो आणि मग ते ‘वळणावर’ येतात. सुरुवात होते ते ती रागावण्यापासून आणि मग हळूहळू मुलांची पाठ शेकायला सुरुवात होते.त्यातली पुन्हा गंमतीची गोष्ट अशी, कोणत्याही पालकाला आपल्या मुलाला मारायला, रागवायला आवडत नाही, पण त्यापासून त्यांना राहावतही नाही. हा संयम तुटतोच आणि मुलांनी ऐकलं नाही, बेशिस्त वर्तन केलं की त्यांना मार बसायला लागतो..मुलांना मारल्यानंतर पालकांनाही खूप खूप वाईट वाटतं. काही पालक तर स्वत:लाच शिक्षा करून घेतात, पण तरीही अपेक्षित बदल दिसत नाही, तो नाहीच.मुलांना वळण, शिस्त लावायची तरी कशी?१- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शिस्त सुरू झाली पाहिजे ती स्वत:पासूनच. आपण स्वत:च जर शिस्त पाळली, सगळ्या गोष्टी वेळच्यावेळी केल्या तर मुलांनाही आपोआपच ते वळण लागेल.२- आपणच जर पसारा करीत असू, वस्तू, आपले कपडे, जेवणाचं ताट, वर्तमानपत्र, अंथरुण, पांघरुण.. कुठेही फेकत असू, आरडाओरडा करीत असू, तर नकळतपणे मुलांच्या मनावरही तेच बिंबत जातं.३- आपल्या बोलण्याचा टोन बघा. तो कधीही वरच्या सुरातला, तिरकस नको.४- मुलांशी बोलत असताना कोणते शब्द आपण वापरतो, रागाच्या भरात आपण काहीही अद्वातद्वा त्यांना बोलतो का, याकडेही लक्ष द्या.५- कोणत्याही कारणानं मूल जेव्हा तुमच्याशी बोलतं, तुमच्याकडे येतं, त्यावेळी त्याला योग्य तोच सल्ला मिळाला पाहिजे. काहीतरी थातूरमातूर सांगून त्याची बोळवण करायला नको. आपल्याला ती गोष्ट माहीत नसेल, तर नंतर, अभ्यास करून, विचारुन सांगा, पण योग्य तीच गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. मुलंही मग आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधताना शॉर्ट कट मारत नाहीत.६- एक लक्षात घ्या, मारझोड करून, आरडाओरड करून, धाकात ठेवून मुलांना कधीही शिस्त लागत नाही. मुलांना शिस्त लागते ती प्रेमानं आणि अनुकरणातून. ही ‘शिस्त’ आपण स्वत:ला लावली, तर मुलं त्यातून खूप काही शिकतील.