सातारा, दि. २७ : ऐरवी अतिक्रमण धारकांवर कठोर पाऊले उचलून प्रशासनाला अनेकदा कारवाई करणे भाग पडते. मात्र गोडोलीतील दुकानदारांनी अशाप्रकारच्या कारवाईची वाट न पाहता होय आम्ही अतिक्रमण केलंय..पण आम्हीच अतिक्रमण काढून घेणार, अशी प्रांजळ कबुली देऊन पोलिसांच्या आवानाला प्रतिसाद दिला.
दिवसेंदिवस शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रस्ते छोेटे..अतिक्रमणधारक मोठे, अशी स्थिती साताºयात दिसू लागली आहे. सातारा शहराचे उपनगर म्हणून समजल्या जाणाºया गोडोली परिसरातही हीच परिस्थिती आहे. अतिक्रमणधारकांमुळे गोडोली परिसरातील रस्ता दिवसेंदिवस अरूंद होत चालला आहे. या मार्गावर नेहमी वाहतुकीची कोंडीही होत असल्यामुळे वाहतूक शाखेने यावर तोडगा म्हणून अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना आवाहन केले.
ज्यांना आपण अतिक्रमण केले आहे, असे वाटते आहे. त्यांनी आपले अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे, असे भावनिक आवाहन सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांनी केले. या आवाहनाला गोडोलीतील दहा दुकानदारांनी तत्काळ प्रतिसाद दिला. ह्यहोय आम्ही अतिक्रमण केली आहेत. पण आमचे आम्ही अतिक्रमण काढून घेतो,ह्ण अशी प्रांजळ कबुली दुकानदारांनी दिली. दोन गोड शब्द बोलल्यानंतर जे काम होणार होते. ते काम बळाचा वापर न करताही होऊ शकते, याची प्रचिती खुद्द पोलिसांनाही यानिमित्ताने आली.