शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

जोडीदारासाठी वाट्टेल ते करणाऱ्यांच्या पदरी केवळ डिप्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 17:18 IST

नातं टिकावं किंवा पार्टनरला बरं वाटावं म्हणून एकानं खूप तडजोडी केल्या तर त्यांचं नातं अधिक सुदृढ होतं का?

ठळक मुद्देजे सतत उत्तम जोडीदार होण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी मन मारतात ते मनातून सतत असमाधानी असतात. त्यांना आपल्या जोडीदाराविषयी वाटणारी ओढ कमी होत जाते किंवा हळूहळू एकेकटं वाटू लागतं.

-चिन्मय लेले 

एकमेकांसोबत रहायचं म्हटलं की, अ‍ॅडजस्टमेण्ट करावीच लागते. हे वाक्य म्हणजे जागतिक सत्यच. ‘तो आणि ती’ यांच्या नात्यात तडजोडीला, मन मारण्याला, पडतं घेण्याला पर्याय नाही. त्याशिवाय नातं टिकूच शकत नाही यात काही शंकाच नाही. कितीही प्रेम असलं एकमेकांवर तरी ‘सोबत’ राहताना वाद होतात, भांडणं होतात आणि कुणा तरी एकाला माघार घ्यावी लागते, पडतं घेऊन गप्पं बसावंच लागतं. मन मारावंच लागतं. पण हे असं पडतं घेत मन मारायचं कुणी.?

कोण मन मारत दुसर्‍यासाठी लहानसहान तडजोडी सतत करतो. सतत काम करून घेतो, सतत लहानसहान गोष्टीत आपल्या मतांचा बळी देतो, मुख्य म्हणजे कोण करतो रोज उठऊन सॅक्रिफाईस.?

सॅक्रिफाईस हा मोठा शब्द असला तरी नातं टिकावं म्हणून, वाद नको म्हणून, केवळ प्रेमापोटी कोण सतत काम करतं, माघार घेतं.?

आणि मुख्य म्हणजे अशी माघार घेत सतत मन मारून कामच करत राहिलं तर त्या दोघांचं नातं पक्कं होतं? वाढतं एकमेकांवरचं प्रेम.?

अलिकडेच प्रसिद्ध झालेला अभ्यास म्हणतो,

-नाही.!

एकानं सतत दुसर्‍यासाठी खस्ता काढल्या, त्याची कामं केली, माघार घेतली तर नातं जास्त काळ टिकतं. मात्र त्यामुळे ‘त्याग’ करून माघार घेणार्‍याला आनंद मात्र होत नाही, समाधान वाटत नाही आणि आपल्या पार्टनरविषयी त्यांना ओढही वाटत नाही.

याउलट, जी लोकं कमी तडजोडी करतात, कमी मन मारतात त्यांचं नातं अधिक रसरशित आणि आनंददायी असतं, दोन्ही पार्टनर एकमेकांसोबत जास्त आनंदी असतात.

‘त्याग’ करा, एकटे व्हा.!

अमेरिकेतल्या अ‍ॅरिझोना विद्यापीठातले प्राध्यापक केसी. जे. टुटेहॅगन यांनी  एक अभ्यास केला. नातं टिकावं किंवा पार्टनरला बरं वाटावं म्हणून एकानं खूप तडजोडी केल्या, त्याग केला लहानसहान गोष्टीतही तर त्यांचं नातं अधिक सुदृढ होतं का, मुख्य म्हणजे असा त्याग करणार्‍या पार्टनरला आनंदी, समाधानी वाटतं का.?

-हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्याचे निष्कर्ष मोठे रंजक आहेत.

ते म्हणतात, जे जोडीदार आपल्या जोडीदारासाठी सतत लहानसहान त्याग करतात, मन मारतात, इच्छा नसली तरी त्याच्या वाटेची कामं करतात ते आपल्या नात्यात जास्त ‘कमिटेड’ असतात. नातं टिकावं म्हणूनच ते जीवाचं रान करत असतात. एक उत्तम जोडीदार होण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्याचवेळी ते मनातून मात्र सतत असमाधानी असतात, आपल्या जोडीदाराविषयी वाटणारी ओढ कमी होत जाते किंवा त्यांना हळूहळू एकेकटं वाटू लागतं. महत्वाचं म्हणजे एवढं सतत जोडीदारासाठी काही ना काही करूनही त्यांना किंवा त्यांच्या जोडीदाराला त्याचं काही अप्रूप वाटत नाहीच. त्यांचं नातं त्यानं सुधारत नाहीच उलट जो सतत तडजोड करतो, राबतो त्याला गृहीत धरणंच सुरू होतं.

त्याचं कारणही उघडच आहे. हल्ली काम-करिअर यांचा एवढा स्ट्रेस माणसांवर वाढलेला आहे की दिवसभराच्या कामाच्या गाडय़ात आणखी चार कामं जास्त एवढीच त्या ‘त्यागाला’ किंमत.

त्याउलट जी माणसं नात्यात फार मन मारत नाही, दुसर्‍यासाठी म्हणून स्वतर्‍ला त्रास करून घेत नाहीत ती जास्त खुशीत असतात. मजेत जगतात आणि अंगाला फार काही लावून न घेतल्यानं रोमान्सबिमान्स करायला मोकळेच असतात.!

‘सायन्स डेली’ला प्रसिद्ध झाल्याप्रमाणे टुटेहॅगन म्हणतात, ‘रोज ढिगानं कामं उपसणारी माणसं केवळ सवयीनं, गरजेपोटी किंवा नको नात्यात आणखी वाद म्हणून परस्परांसाठी काही कामं करतात, पण त्यामुळं त्यांचं नातं बळकट होत नाही. उलट स्ट्रेस वाढतोच.’’

पण मग प्रश्न पडतो की, नात्यात तडजोड करायचीच नाही का.?

त्यावर उत्तर एकच, तडजोड करावीच लागते. पण केवळ नातं टिकावं म्हणून किंवा जोडीदाराला बरं वाटेल म्हणून वाट्टेल तेवढे कष्ट उपसू नयेत. शक्य असेल ते करावं आणि त्याची जाणीवही समोरच्याला करुन द्यावी.

तरच त्या नात्यातून आनंद मिळतो. नाहीतर होते ती केवळ मन मारून कुचंबणा.