Relationship : चिपकू जोडीदाराला असे ठेवा दूर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 16:57 IST
चिपकू जोडीदारासोबत कसे वागावे यासाठी या काही महत्वाच्या टीप्स
Relationship : चिपकू जोडीदाराला असे ठेवा दूर !
बऱ्याच बॉलिवूड चित्रपटात चिपकू जोडीदाराच्या कथा दाखविण्यात आल्या आहेत. कदाचित आपल्याही जीवनात चिपकू जोडीदार असेल तर त्याचा आपणास नक्की कंटाळा येतो. तो दिवसभर तुम्हाला सतत मेसेज अथवा फोन करीत असेल? तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत एखाद्या वेकेशन वर असाल तर तो तुमच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत असेल? तर अशा अति चिपकू व्यक्ती सोबत तुमचे नाते पुढे नेणे फारच कठीण जाऊ शकते. कारण तुम्ही जरी त्याच्यावर जीवापाड प्रेम करीत असला तरी तुम्हाला त्रास देण्याचा त्याला मुळीच अधिकार नाही.चिपकू जोडीदारासोबत कसे वागावे यासाठी या काही महत्वाच्या टीप्स- सर्वप्रथम हे जाणून घ्या की तो असा का वागतो आहे.त्याला तुमच्यावर विश्वास नसल्यामुळे त्याला असुरक्षित वाटत आहो का? की त्याच्याकडे खूप रिकामा वेळ आहे? किंवा त्याच्या एक्स गर्लफ्रेन्ड कडून त्याला पुर्वी याबाबत काही चुकीचा अनुभव आला आहे का? हे जरुर जाणून घ्या.कारण यापैकी एखादे कारण असल्यास तुम्ही त्याला नीट समजावून सांगू शकता. कदाचित त्याला हे माहितच नसेल की तो ओवर्ली अटॅच्ड आहे.कारण ब-याच मुलांना असे वाटते की मुलींना त्यांच्याकडे सतत लक्ष दिलेले फार आवडते.त्यामुळे त्याच्यासोबत वाद घालत बसण्यापेक्षा त्याला या विषयी समजावून सांगणे तुमच्या अधिक फायद्याचे ठरेल.त्याला तुमच्या मनात काय भावना आहेत ते स्पष्टपणे सांगा. कारण अनेक पुरुषांचा असा समज असतो की महिलांना असे जास्त काळजी घेणारे अथवा अति जवळ राहणारे पुरुषच आवडतात. पण जर तुम्ही त्या मताच्या नसाल तर तुमचे मत परखडपणे त्याच्यासमोर मांडा ज्यामुळे तुम्हाला दोघांमध्ये अंतर ठेवणे सोपे जाईल.जर तो दिवसभर सतत तुम्हाला मेसेज अथवा फोन करीत असेल.तर त्याला समजावून सांगा की दिवसभर तुम्ही कामाच्या गडबडीत असता ज्यामुळे तुम्ही त्याच्या प्रत्येक मेसेजला रीप्लाय देऊ शकत नाही.तुम्ही त्याला टाळत नसून तुम्ही कामात बिझी आहात हे त्याला स्पष्टपणे समजावून सांगा. जेव्हा तुम्ही फॅमिली वेकेशनवर असता अथवा मित्र-मैत्रिणींसोबत पिकनिकला जाता तेव्हा त्याला देखील लाडीगोडी लावून त्याच्या घरच्यांसोबत अथवा मित्रांसोबत बाहेर जाण्यास सांगा. ज्यामुळे तुम्ही दोघेही आपापल्या घरच्यांसोबत अथवा मित्र-मंडळीसोबत मजा करीत असल्यामुळे खुश रहाल. त्याचाही वेळ चांगला गेल्यामुळे तो तुम्हाला सतत संपर्कात राहण्यासाठी हट्ट करणार नाही.तुम्ही त्याला दाखवून द्या की जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत असता तेव्हा तुम्ही त्याच्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करीत नाही.तुम्ही तुमच्या डेटवर वेळेवर जाता व इतर कोणत्याही गोष्टी तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये आणत नाही. असे सांगितल्यामुळे त्याला तुमच्याबद्दल विश्वास वाटू लागेल व त्याच्या मनातील असुरक्षितपणा देखील आपोआप कमी होईल.source : thehealthsite.com