शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

मुलांच्या मनातला भावनांचा कल्लोळ शांत कसा कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:41 IST

मुलांचा इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी या काही क्लृप्त्या..

ठळक मुद्देफ्रस्ट्रेशन, नैराश्य पॉझिटिव्हली कसं हाताळायचं हे मुलांना कळलं पाहिजे.प्रश्न लवकरात लवकर कसे सोडवता येतील, हे मुलांना कळलं तर ते आव्हानांशी लढायलाही शिकतील.स्वसंवादाशिवाय आपल्यातल्या कमतरता आणि आपल्या जमेच्या बाजू याविषयी नीटशी कल्पना येत नाही. या स्वसंवादासाठी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं.

- मयूर पठाडेलहान लहान मुलं.. अगदी शाळकरी, पण तरीही त्यांच्याही मनात भावनांचा कायमच कल्लोळ असतो. आजकालच्या फास्ट आणि अभासी जगात तर भावनांचा हा गुंता अधिकच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.आपल्याला वाटतं, मुलं लहान आहेत, त्यांना कसलं आलंय टेन्शन आणि चिंता, पण खरं तर या वयातलं टेन्शन आणि त्यांच्या भावनांचा निचरा योग्य वेळीच केला गेला नाही, तर पुढे आयुष्यभर या गोष्टी त्यांना त्रास देतात आणि याच ठिसूळ पायावर त्यांची भविष्याची इमारत उभी राहते, त्यामुळे मुलांच्या इमोशनल इंटेलिजन्सकडे अधिक गांभीर्यानं पाहाण्याची गरज आहे.मुलांचा इमोशनल इंटेलिजन्स कसा वाढवायचा, हे आपण गेल्या भागात पाहिलं, या भागात त्याविषयी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी..१- आजकाल कोणतीही मुलं पाहा, ती पटकन चिडतात, लगेच इमोशनल होतात, काही आपल्याशीच कुढतात, तर काही आदळआपट करतात.. त्यांच्यातल्या वागणुकीचाच बदल पालकांना लक्षात येतोच, पण त्यावर आपणही काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा कल्लोळ शांत कसा करता येईल याकडे आधी लक्ष द्यायला हवं. डिप ब्रिदिंग, एक ते शंभर आकडे मोजणं, त्या वातावरणातून थोडा वेळ त्यांना बाहेर नेणं.. यासारख्या गोष्टींनी आपल्या भावनांवर कंट्रोल करणं त्यांना शिकवता येईल.२- फ्रस्ट्रेशन, नैराश्य प्रत्येकालाच येतं, पण त्यावरची प्रतिक्रिया नकारात्मकच असली पाहिजे असं नाही. हे नैराश्य पॉझिटिव्हली कसं हाताळायचं हे मुलांना कळलं पाहिजे.३- प्रश्नांच्या भोवºयात गिरक्या मारत राहण्यापेक्षा हे प्रश्न लवकरात लवकर कसे सोडवता येतील, त्यातून कसं बाहेर पडता येईल हे मुलांना कळलं तर ते आव्हानांशी लढायलाही शिकतील.४- प्रत्येक टप्प्यावर आपला आपल्याशी संवादही महत्त्वाचा असतो. स्वसंवादाशिवाय आपल्यातल्या कमतरता आणि आपल्या जमेच्या बाजू याविषयी नीटशी कल्पना येत नाही. या स्वसंवादासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं.५- भावभावनांचा सामना करताना काही क्लृप्त्याही वापरता येतील. प्रत्येक वेळी आपणच जिंूक किंवा हरू असं होत नाही. ‘विन-विन’ सिच्युएशन मात्र प्रत्येक वेळी आणता येते. ही परिस्थिती कशी आणता येईल याचं भान मुलांना आलं तर ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्या भावना हाताळू शकतील.