शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

‘पडू’ द्या की मुलांना, हे पडणंच त्याला आयुष्यात उभं राहायला शिकवील!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 18:17 IST

निर्णय आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारीच घेता आली नाही, तर कसं मोठं होणार आपलं मूल?

ठळक मुद्देपडण्यातला आनंद घेऊ द्या मुलांना.स्वातंत्र्य द्या, मोकळीक द्या आणि जबाबदारी घ्यायलाही शिकवा.मुलाचा निर्णय नसेल पटत, पण निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना देणार की नाही?मुलांच्या पायात पाय घालण्यापेक्षा द्या त्यंना प्रामाणिक साथ.

- मयूर पठाडेआपली मुलं.. आपण सुरुवातीपासून त्यांना तळहातावरच्या फोडासारखं जपतो. ती असतातच आपली जीव की प्राण.. त्यांना काही झालं की तीळतीळ तुटतोच आपला जीव.. स्वत:लाच अपराधी असल्यासारखं वाटायला लागतं..पण एक लक्षात येतंय आपल्या? आपली मुलं एवढी मोठी झाली.. हो, मला माहीत आहे, मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्यासाठी ती लहानच असतात. अगदी कितीही ती मोठी होऊ देत.. पण आईबापापुढे त्यांचं मोठेपण खुजं असतं.. पण एवढी मोठी होऊनही ती आपला स्वत:चा निर्णय स्वत: का घेऊ शकत नाहीत? का त्यांना कुठल्याही निर्णयासाठी आपल्या आईवडिलांवर, शिक्षकांवर, वडिलधाºयांवर कायम अवलंबून राहावं लागतं?मुलांना का घेता येत नाहीत स्वत:चे निर्णय?१- याचं कारणही आपल्या मुलांवर असलेल्या आपल्या अतीव प्रेमावर आहे. आपण त्यांना जीव लावतो, पण त्यांच्यावर जबाबदारी टाकायला आपणच घाबरतो.२- जबाबदारी घेण्याची सवयच नसलेली मुलं कुठलाही निर्णय घेताना मग कायमच कचरतात. करू की नको.. जाऊ की नको.. अशी काचकुच त्यामुळे कायमच त्यांच्या मनाला घेरुन बसलेली असते.३- मुलांनी आपले निर्णय स्वत:चे स्वत: घ्यावेत यासाठी त्यांना तशी मोकळीक दिली पाहिजे. निर्णयांची जबाबदारी घ्यायलाही शिकवलं पाहिजे. त्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे.४- एक गोष्ट मात्र पालक म्हणून आपण कायम लक्षात घेतली पाहिजे. आपलं मूल जे काही सांगतंय, मोठं होण्याचा प्रयत्न करतंय, त्यात तुमची प्रामाणिक साथ असली पाहिजे. मध्येच त्याला अडवून त्याच्या पायात खोडा घालणं आपण थांबवलं पाहिजे.५- मुलाचं बोलण मध्येच थांबवून, आपलंच घोडं पुढे दामटण्यापेक्षा शांतपणे आधी त्याचं ऐकून घ्या. अगदीच वाटलं, तर त्याचे बरेवाईट परिणाम त्याला समजावून सांगा, पण त्याच्या पाठीशी ठाम उभे राहा. ही पहिली पायरी आहे, बघा, आत्मविश्वासाचं बिजारोपण त्याच्यात होतं की नाही?६- आपलं नातं किती निकोप आणि निरोगी राहील याचा असोशीनं प्रयत्न करा. अशा वातावरणातच निर्भयपणे काही करण्याची आणि परिणामांची जबाबदारी घेण्याची वृत्तीही जोपासली जाऊ शकते.७- ओव्हर रिअ‍ॅक्ट होणं टाळा. शांतपणे मुलाची बाजू समजून घ्या. तुम्हाला कदाचित नसेल पटत त्याचं म्हणणं, पण त्याच्या बोलण्याचा हक्क तुम्ही हिरावून नाही घेऊ शकत.. हे लक्षात असू द्या.८- स्वत:चे निर्णय स्वत: कसे घ्यायचे, त्याचं स्कील तुमच्या अनुभवातून तुम्ही जरूर शिकवा, पण पाहू द्या की त्यालाही एकदा पडून. कळू द्या त्याला, त्या पडण्यातही आनंद आणि यशाची पहिली पायरी दडलेली असते ते!...