शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

एकुलतं एक मूल असणं हा काही दोष नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 13:50 IST

एकच मूल असणं हा काही पालकांचा दोष नव्हे, त्यामुळे हे मूल लाडावलेलं, एकेकटंच असणार असं काही नाही!

ठळक मुद्देशिक्षणाच्या, विकासाच्या जास्त संधी एकाच मुलाला देता येतात. त्यांना दज्रेदार राहणीमान, आरोग्यसेवा, पुरवता येतात. एकुलती एक असलेली मुलं शिक्षणात जास्त यशस्वी होतात. स्वावलंबी होतात. इतरांशी सहज मैत्री करतात. कुटुंब लहान राहिल्यानं दरडोई उत्पन्न वाढतं. कुटुंबाचा सामाजिक, आर्थिक स्तर उंचावतो. पर्यायच नसल्याने लहान कुटुंबाचे आपापसातले नातेसंबंधही घट्ट होतात.

-डॉ. अनिल मोकाशी

 

बरोबर आहे, एकुलता एक आहे नं ! डोक्यावर बसणारच, मुलांच्या कोणत्याही समस्येला ‘एकुलता एक’ हे कारण सर्रास दिलं जातं. एकच मुल असणं खरंच इतकं चुकीचं आहे का? एकच मूल असणं चुकीचं नाही. पण ही एकुलती एक मुलं इतरांपेक्षा वेगळी नसतात हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. कृष्णाच्या सात बहीणी कंसाने मारल्या अन् तो एकुलता एक राहिला.  एक सुभाषितही माझ्या ऐकीवात आहे. देवा, अनेक मुर्ख मुलांपेक्षा एकच पण गुणी मुलगा मला दे! अनेक तारका नाही, तर एकटा चंद्रच रात्रीचा अंधार नाहीसा करू शकतो. साहित्य पुराणांचं जाऊ द्या, विज्ञान काय म्हणतं बघू, कौटुंबिक मानसशास्त्राचं मत बघू. तीन चार पिढय़ांचे, पंधरा वीस जणांचे, वाडा, अंगण, तुळशी वृंदावन, गोठा, दुभत्या जनावरांसह नांदणारे गोकुळ आता इतिहासजमा झाले. ‘हम दो हमारे दो ब्रँड चौकोनी कुटुंब’ ही गेल्या पिढीतली संकल्पना होती. ‘एकच मूल कुटुंब’ ही आजची परंपरा आहे.

बिनभावंडांचे कौटुंबिक वातावरण हा या प्रश्नाचा गाभा आहे. चीनमध्ये ‘एकच मूल धोरण’ आहे. काही पालक निर्णय घेऊन एकावर थांबतात. पण तसंही दुसर्‍या बाळाचा जन्म होईर्पयत पहिले मूल एकटेच असते. बर्‍याच वर्षानी झालेलं दुसरं मुलसुद्धा ‘एकुलत्या’ वातावरणातच वाढतं. कुणाला दुसरं मूल होतच नाही. कुणाचं मूल आजार, अपघात अशा कारणांनी जाते. कुणाला कौटुंबिक, वैवाहिक समस्या असतात. कुणाला नोकरीधंदा असल्यानं दुसरं मूल नको असतं. कारणं काहीही असो, एकच मूल असल्याचे फायदे, तोटे यांचा विचार करून आपल्याला योग्य असा निर्णय घ्यावा लागतो.

तुमचं प्रेम, लक्ष, वेळ, शक्ती, पैसे एकाच मुलावर केंद्रीत करता येतात. शिक्षणाच्या, विकासाच्या जास्त संधी एकाच मुलाला देता येतात. एकुलती एक असलेली मुलं शिक्षणात जास्त यशस्वी होतात. स्वावलंबी होतात. इतरांशी सहज मैत्री करतात. त्यांना दज्रेदार राहणीमान, आरोग्यसेवा, पुरवता येतात. कुटुंब लहान राहिल्यानं दरडोई उत्पन्न वाढतं. कुटुंबाचा सामाजिक, आर्थिक स्तर उंचावतो. पर्यायच नसल्याने लहान कुटुंबाचे आपापसातले नातेसंबंधही घट्ट होतात.

एकुलती एक मुलं राजपुत्राचं आयुष्य जगतात. हट्टी, लाडावलेली, स्वार्थी, बिघडलेली, एकलकोंडी अशी अनेक विशेषणं त्यांना लावली जातात. हे सब झूठ है! या सर्व दंतकथा आहेत.

ती एकटी पडतात हे खरं आहे. एकुलत्या एक मुलावर मोठेपणी दोन आईवडील आणि चार आजीआजोबा अशा सहा वृद्धांची जबाबदारी येते. आजकाल आयुष्यमान वाढल्यानं अनेक घरात हा प्रश्न निर्माण होतो. प्रश्न फक्त आर्थिक नाही. वृद्धांना भावनिक व दैनंदिन जीवनासाठीही आधार लागतो. तो मिळाला नाही तर ते अनाथ होतात.

कमावत्या एकुलत्या एका लेकीला लग्न करणं जड जातं. नैराश्य येऊ शकतं. लग्नानंतर तिला स्वतर्‍चे आईवडील, सासुसासरे, नवरा आणि मुलं सांभाळावे लागतात. अशा ती पिढय़ांचा आधारस्तंभ व्हावं लागतं. अशा पिढीला ‘घुसमटलेली पिढी’ म्हणतात. (सँडविच जनरेशन).

पालकांनी हे समजून घ्यावं.

एकाच मुलानंतर थांबण्याचा निर्णय तुम्ही त्या मुलाच्या भल्यासाठीच घेतला होता. तुम्ही त्याच्यावर अजिबात अन्याय केलेला नाही. तेव्हा अपराधीपणाची भावना नको. त्याला वेळ द्या. त्याच्याशी बोला. महागडय़ा खेळण्यांची, वस्तूंची आवश्यकता नसते. गृहिणी असाल तर ‘त्याच्याशिवाय’ इतरही कशात तरी रस घ्या. नाहीतर त्याचं आयुष्य त्याच्यासाठी तुम्हीच जगण्याची चूक कराल. त्याला मोकळीक द्या. वाव द्या. तुम्ही नोकरी-धंदा करणारी आई असाल तर तुम्हाला मिळेल तेवढय़ा तासाभरात त्याचं जेवण, अभ्यास, छंद, खेळ, शिस्त सगळं कोंबायचा प्रयत्न करू नका. कळीच्या पाकळ्या ओढून तिला फुलवता येत नाही.  मुलाला हवी असते ती साथ संगत. ती तुम्ही दिली नाही तर तो चुकीच्या संगतीत जाऊ शकतो किंवा एकलकोंडा होतो. बोलायला कुणी उपलब्ध नसेल तर मानसिकता बिघडते. आईलाच त्याची बहीण, भाऊ, मित्र व्हावं लागतन. वेगवेगळ्या कला, खेळ, छंद,  पुस्तकांमध्ये त्याला गुंतवा. टी.व्ही. आणि इंटरनेटवर 1-2 तासाचं बंधन घाला, नाहीतर त्याच मन भावनारहित यांत्रिक बनेल.

त्याच्या स्वतर्‍चा व तुमचा मित्रपरिवार आवजरुन वाढवा. लग्न, मुंज, समारंभ, क्लब, मंडळांमध्ये रस घ्या. त्याला बरोबर न्या. त्याचे आजी आजोबाबरोबर रहात नसतील तर जवळपासचे शोधा. नक्की सापडतात. जवळपास राहणारी मानलेली बहीण किंवा भाऊ ही अतिशय चांगली संकल्पना आहे. निवड करून कौटुंबिक संबंध वाढवा. राखी, भाऊबीज, वाढदिवस, तिळगुळ कार्यक्रमांमध्ये त्यांचे मानलेले नाते घट्ट करायची संधी द्या. समाजात मिसळणं हा एकटेपणावरचा तोडगा आहे. दुसरं  मुल दत्तक घेणे हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे.

 काळ सोडून सगळ्या गोष्टी बदलतो. कुटुंबातल्या काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात, काही नव्या येतात. कुटुंबाची रचनाच बदलती असते. बदलांना सामोरे जाण्याचे शिक्षण त्याला द्या. मुलाने आईवडील रहात असतील तिथंच नोकरी व्यवसाय करावा, किंवा आई-वडिलांनी मुलाकडे जावं हे सामंजस्य नसेल तर कुटुंब विभाजन अटकळ आहे. आजच्या परिस्थितीत शेजारचा फ्लॅट घेऊन स्वतंत्र राहणं हा उत्तम मार्ग आहे. गरज पडेल तेव्हा एकत्र, एरवी स्वतंत्र!

तुमचा एकुलता एक कुलदिपक/दीपिका काही चुकीचं वागले  तर नाराज होऊ नका. प्रत्येकच मूलकधी ना कधी चुकीचं वागतं. आशावादी रहा. शेवटी हे सगळं प्रकरणच सकारात्मक पालकत्वाचं आहे.

( लेखक बारामतीस्थित सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत.)