- मयूर पठाडेमुलांनी नेहेमी खरं बोलावं, खोटेपणाचा आधार घेऊन कधीच कोणाला शेंड्या लावू नयेत किंवा तशी सवय त्यांना लागू नये यासाठी आपण पालक म्हणून बरीच काळजी घेत असतो. तरीही मुलं खोटं बोलायची थांबत नाहीत किंबहुना खोटं बोलायची त्यांची सवय दिवसेंदिवस वाढतच जाते. मुलांना त्यांबद्दल कितीही रागवा, टोचून बोला, पण तेवढ्यापुरतं ते ऐकतात, पुन्हा येरे माझ्या मागल्या!का होतं असं?मुलं का खोटं बोलतात? इतक्या वेळेस सांगूनही ते का ऐकत नाहीत किंवा त्यांच्या ते पचनी का पडत नाही..खरंतर यासंदर्भात मुलांना रागवून आणि त्यांना घालूनपाडून बोलण्यात काहीच अर्थ नाही. कारण बºयाचदा हे खोटं बोलणं ते घरूनच शिकलेले असतात!मुलांनी खोटं बोलू नये यासाठी काय करायला हवं?१- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरात नेहमी खरंच बोललं जातं, त्या घरातले पालक आणि मुलं यांच्यातील नात्याचे बंध नेहमीच पक्के असतात. त्यांच्यातील जवळीकही अधिक असते.२- घरात वडीलधारी मंडळीच प्रसंगपरत्वे खोटं बोलत असतात. असते ती छोटीशी गोष्ट, पण मुलांच्या मनावर ते ठसतं.३- साधी गोष्ट.. फोनवर किंवा कोणी आपल्याकडे आलं असल्यास मुलालाच सांगितलं जातं, ‘सांग त्यांना, बाबा घरी नाहीत म्हणून!’ हाच ‘संस्कार’ पुढे मुलांवर होतो.४- खरं बोलण्याचा संस्कार घरातूनच झालेला असल्यास मुलं खोटं बोलण्याच्या नादी फारसं लागत नाहीत, पण समजा एखाद्या वेळी बोललंच मूल खोटं, तर लगेच त्याच्यावर ‘तू खोटारडा’ आहेस’ असं लेबल लावू नका. त्यानं उलटाच परिणाम होईल.५- मुलांवरती आपलं प्रेम निरपेक्ष आहे, कुठल्याही अटींवर ते अवलंबून नाही, हे मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून समजलं पाहिजे. तू कसाही असलास तरी आमचा आहे, आम्हाला हवा आहेस, हे मुलांना कळलं तर खोट्याचा सहारा ते घेणार नाहीत.६- आणखी एक महत्त्वाची गोष्ट. आपलं मूल कधीच खोटं बोलणार नाही, असा अनेक पालकांना अति आत्मविश्वास असतो. त्यामुळे मूल खोटं बोलत असलं तरी ते स्वीकारायची त्यांची तयारी नसते. वास्तव स्वीकारून मुलाला जर नीट समजावून सांगितलं तर नक्कीच त्यांची ही सवय सुटू शकते.
खोट्टारडा कुठला!..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 16:09 IST
मुलांवर कुठलंही लेबल लावण्याआधी थांबा.. खोटं बोलण्याची सुरुवात कुठून होते आहे ते आधी तपासा..
खोट्टारडा कुठला!..
ठळक मुद्देमुलाला कधीच घालूनापाडून बोलू नका.खरं बोलण्याचे संस्कार घरातूनच झाले पाहिजेत.मुलांवरचं आपलं प्रेम निरपेक्ष आहे हे मुलांना कळलं पाहिजे.‘आहेसच तू खोटारडा’ अशी लेबलं मुलांवर लावू नयेत.