शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला स्वतःचा खूप राग येतो?-मग तुम्ही यशस्वी नाही होऊ शकत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:15 IST

स्वतःत सुधारणा करावीशी वाटणं चूक नाही, पण स्वतःला लाथाडून ते जमणार नाही.

ठळक मुद्देतुम्हाला येणारा स्वतःचा हाच प्रगतीतला मोठा अडथळा आहे, असं सांगितलं तर विश्वास ठेवाल?

तुम्हाला स्वतःचा  खूप राग येतो का? खूप चिडचिड होते स्वतःवर? वाटतं सुधारुन टाकावं स्वतःचा ला. काहीच आवडत नाही. रंगरुप, आपली बुद्धीमत्ता, आपले पालक, आपली आर्थिक-सामाजिक परिस्थिती, आपल्याला येत असलेली किंवा नसलेली भाषा, आपला ड्रेसिंग सेन्स, आपले इमोशनल घोळ, आपलं बोलणं, अशी यादी करु तितकी लांबत जाते. आणि ती इतकी वाढते की, आपल्याला आपलं असं काही आवडतंच नाही. खूप राग येतो स्वतःचा . इतका की, आपण आपल्यालाच आवडत नाही. आपलं काहीच आवडत नाही. मात्र हे असं सतत होण्यानं होतं काय की, आपण स्वतःलाच लाथाडतो. आणि तसं सतत केल्यानं आपणच आपल्या वाटेत अडथळा होवून बसतो.

मुद्दा काय, सोपा आहे. एखादा माणूस आपल्याला आवडायला लागला तर विचार करा, आपण त्यासाठी काय काय करतो. माया करतो. त्यासाठी जीवाचं रान करतो,कळ सोसतो. त्याच्या आनंदात आनंद मानतो. त्याला बदलवायच्या भानगडीत पडत नाही. उलट आपण त्याच्यासारखे वागायला लागतो. आनंदी असतो. आनंद देतो. आणि मग ते प्रेम फुलतं.

हेच आपण आपल्याबाबतीत करत नाही, आपण आपल्याला स्वीकारत नाही. स्वतःचा वर प्रेम करत नाही, लाडलाड करत नाही मग कसंकाय आपलं शरीर, आपली बुद्धी आपल्याला साथ देईल? आपली प्रगती होईल?

 ती नाहीच होत. आपण स्वतर्‍वर सतत चिडल्यानं, स्वतःला नाकारल्यानं फक्त दोष देत राहतो, कधी स्वतर्‍ला, कधी इतरांना. आणि त्यातून बदलत काहीच नाही. त्यामुळे नुस्ता रागराग करुनही प्रश्न सुटत नाहीत. ते वाढतातच. त्यापेक्षा या दोन गोष्टी करा.

1) जे आहे ते स्वीकारा. म्हणजे उदा. आपलं वजन खूप कमी आहे, आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडत नाही म्हणून चिडचिड करत बसण्यापेक्षा, स्वतर्‍चा राग राग करण्यापेक्षा. जे आहे ते मान्य करा आणि विचारा स्वतर्‍ला की हे मी बदलू कसा शकतो? उत्तरं मिळवा, मार्ग काढा. कामाला लागा.

कायम हेच सूत्र पाहिजे, जे स्वतःसंदर्भात आवडत नाही, ज्यात सुधारणा करायची ते काय हे पाहून लगेच कामाला लागणं. एकेक बदल करत जाणं. त्यानं स्वतःचा अभिमान वाटू शकतो.

2) इंग्रजीत राईट अ‍ॅँगर आणि रॉँग अ‍ॅँगर अशी एक कल्पना आहे. म्हणजे काय तर नुस्ता वांझोटा राग. चिडचिड, बडबड. बदल काहीच नाही. त्यापेक्षा हा राग योग्य ठिकाणी लावा, त्यातून काहीतरी सकारात्मक घडवा. राग ही आग आहे, त्यानं स्वतर्‍ला जाळून खाक करायचं की दिवे उजळवून सगळीकडे प्रसन्न प्रकाश पोहचवायचा, हा निर्णय कायम आपलाच असतो.