शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन आजपासून

By admin | Updated: July 14, 2016 00:40 IST

जिल्हा परिषद मध्ये कार्यरत लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांवर वेतन आयोगाचा तफावतीचा अन्याय होत आहे.

प्रकाश वराडकर / रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, या मोर्चेबांधणीत कॉँग्रेस कुठेही दिसत नाही. कॉँग्रेस पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही, तालुकाध्यक्ष व अन्य ब्लॉकचीही अनेक पदे रिक्त आहेत. कार्यकर्त्यांचे मोहोळ उठवणारा नेता जिल्ह्याला मिळणार कधी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अंधारात चाचपडणाऱ्या व मृतवत झालेल्या कॉँग्रेस संघटनेला फिनिक्स पक्ष्याची उभारी कधी मिळणार आणि कोण देणार, याचीच चर्चा सुरू झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे जिल्ह्यात पानिपत झाले. जिल्ह्यात सध्या शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. सेनेचे तीन, तर राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाचे व रत्नागिरी - रायगड मतदारसंघाचे खासदारही सेनेचेच आहेत. जिल्हा परिषद, नगरपरिषद व पंचायत समिती निवडणुकीची मोर्चेबांधणी शिवसेनेनेही सुरू केली आहे. गुप्तपणे त्यांची निवडणूक तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसची निवडणूक तयारीही जोरात आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गची जबाबदारी असलेले भास्कर जाधव यांनी रत्नागिरीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. सेनेत गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात येण्याचे आवाहन करण्यात आले. या मेळाव्यात सेनेचे आमदार उदय सामंत यांना राजकीय आव्हान दिले. त्यावर सामंत यांनीही पलटवार केला. राष्ट्रवादीचे मेळावे प्रत्येक तालुक्यात सुरू आहेत. निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादीला ओव्हरटेक करण्यासाठी भाजपचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने जिल्हा पिंजून काढत आहेत. भाजप महिलांची आघाडीही रश्मी कदम यांच्या नेतृत्त्वाखाली सक्षम केली जात आहे. महिलांचे मेळावे होत आहेत. याउलट कॉँग्रेसमध्ये भयाण शांतता आहे. जिल्हाध्यक्षपदाची धुरा असलेले रमेश कीर यांनी दीड वर्षापूर्वीच प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांना जिल्हाध्यक्ष बनवावे, अशी मागणी राणेसमर्थकांकडून करण्यात आली. त्याची व्यूहरचनाही झाली. कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. परंतु प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नीलेश राणे व रमेश कीर या दोघांनाही प्रदेश कार्यकारिणीवर घेतले. जिल्हाध्यक्षपदाचा विषय पुन्हा भिजत पडला. ज्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस स्थापन झाली, त्यावेळी जिल्ह्यातील कॉँग्रेसचा खरा लचका तोडला गेला. त्यानंतरच्या काळात कार्यकर्तेच कमी असल्याने नेत्यांचीही कुचंबणा झाली. राष्ट्रीयस्तरावरील कॉँग्रेसची दयनीय स्थिती याआधी जिल्ह्यात एवढी कधी नव्हती, असे कॉँग्रेसजनांचेच मत आहे. कॉँग्रेसला मानणारे व कार्यकर्ता म्हणून अभिमानाने सांगणारे कार्यकर्ते आजही कॉँग्रेसमध्ये आहेत. परंतु त्यांना खंबीर नेतृत्त्वाचा अभाव असल्याचे सध्याचे चित्र आहे. विधानपरिषद सदस्याच्या रुपाने विधिमंडळात पोहोचलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेच रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनेला उभारी देऊ शकतील, असा अनेकांना विश्वास वाटतो आहे. राणे हे कुशल संघटक आहेत. त्यामुळे संघटनेच्या ‘फिनिक्स भरारी’साठी तेच काही करू शकतील, अशी कार्यकर्त्यांना आशा वाटते आहे. ही आशा पूर्ण होणार का, हा प्रश्न आहे.