शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी तरुणाला ३ वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST

रत्नागिरी : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने सोमवारी तीन वर्षे ...

रत्नागिरी : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने सोमवारी तीन वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना शहरानजीकच्या भाट्ये परिसरात ९ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ८ वाजण्याचा सुमारास घडली होती. तजमुल जैनुद्दीन भाटकर (३३, रा. भाट्ये, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्याविरोधात पीडितेने तक्रार दिली हाेती. या तक्रारीनुसार ९ ऑगस्ट रोजी रात्री ती आपल्या लहान बहिणीला क्लासहून घरी आणण्यासाठी जात होती. त्या वेळी तजमुलने तिच्या पाठीमागून जाऊन गैरकृत्य केले व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत तिने तक्रार देताच पाेलीस उपनिरीक्षक मुक्ता भोसले यांनी तपास करून तजमुल याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३५४(अ) आणि पोक्सो कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. ९ महिने हा खटला न्यायालयात सुरू होता. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. मेघना नलावडे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून सोनाली शिंदे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे ६ ते ७ साक्षीदार तपासून केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी तजमुल याला १ वर्ष शिक्षा व ५ हजार रुपये दंड, तो न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच कलम ७ व ८ नुसार १ वर्ष शिक्षा व १० हजार रुपये दंड, तो न भरल्यास ६ महिने साधा कारावास आणि कलम ११ व १२ नुसार १ वर्ष शिक्षा व १ हजार रुपये दंड, तो न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी एकूण ३ वर्षे साधा कारावास आणि १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.