शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत १० हजाराच्या गांजासह तरुण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

रत्नागिरी : शहरातील झाडगाव - परटवणे रोड दरम्यान शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत १० हजार रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला. ...

रत्नागिरी : शहरातील झाडगाव - परटवणे रोड दरम्यान शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत १० हजार रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांनी केली. या कारवाईत प्राैढाला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.

शहरातील झाडगाव - परटवणे रोड दरम्यान नदीकिनारी एक तरुण गांजा विक्री करत असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांना मिळाली होती. या माहितीवरून या परिसरात पोलिसांनी पाळत ठेवली होती. या मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेऊन झाडगाव-परटवणे परिसरात सापळा रचला होता. शहर पोलिसांचे एक पथक साध्या वेशात या परिसरात तैनात होते.

गांजा विक्री होत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, गांज्याच्या ५ पुड्या एका प्रौढाकडे सापडल्या. या गांज्याची किंमत १० हजार १२० रुपये असून, पोलिसांनी गणेश पांडुरंग वाडेकर (४०, रा. शिवाजी हायस्कूलजवळ) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

दरम्यान, ही कारवाई शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार गणेश सावंत व रत्नकांत शिंदे यांनी केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आपल्या परिसरात गांजा विक्री होत असल्याचे उघडकीस आल्याने येथील रहिवासी चांगलेच धास्तावले आहेत.