शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तरुण पिढीने पुढे यावे : इंदुलकर

By admin | Updated: February 13, 2015 22:59 IST

शिरगावची बैठक: प्रबोधक बैठकीला तालुक्यातून प्रतिसाद

चिपळूण : सध्याच्या वेगवान युगात स्वत:मधील शक्तीस्थाने बळकट करण्याची संधी आजच्या तरुण पिढीला उपलब्ध झाली आहे. या संधीचा समाजाच्या विकासासाठी उपयोग करावा, असे आवाहन श्रमिक सहयोगचे राजन इंदुलकर यांनी केले.चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे विकास सहयोग प्रतिष्ठानतर्फे युवकांसाठी प्रबोधक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. आजची मुले ही खरोखरच भाग्यवान आहेत. पूर्वीपेक्षा विविध सुविधा आता उपलब्ध आहेत. त्यामुळे, आयुष्याची वाटचाल करीत असताना आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, हेदेखील अत्यंत जागरुक आणि डोळसपणे पहावे लागणार आहे. समाज, जाती, धर्म, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यामध्ये अडकलेल्या समाजाला यातून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी युवा पिढीवरच आहे. तरूणांचे जागरूक मन समाजाला आज एका निर्धाराने पुढे नेऊ शकते. त्यामुळे आपले आयुष्य जगताना चौफेर व दिशादर्शक वाटचाल आपणास करावी लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या जागृत समाजाच्या निर्मितीची पाऊले आताच पडू द्या, असे आवाहन इंदूलकर यांनी केले.ललेश कदम म्हणाले की, धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या नावाने चालणारे राजकारण धोकादायक वळण घेऊ शकते आणि याचा पहिला बळी तुमच्यासारखे युवक-युवती ठरणार आहेत. त्यामुळे, आपली जागरूकता व संवेदनशीलता देशाचे भवितव्य घडवू शकते.सगळीकडे सामाजिक न्यायाच्या गप्पा मारल्या जात असताना, खरोखरच दिनदुबळ्या अशा समाजाला हा न्याय मिळतो का? असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू रहाणार आहे. कारकूनी नोकरी करण्यावर अवलंबून राहिलो तर या देशात मोठी उपासमार होऊ शकते. म्हणून शेती, पर्यावरण, सहकार, प्रामाणिकपणा, लिंगभेद आदींच्या संरक्षणासाठी आजच्या युवा पिढीला कटीबद्ध व्हावे लागेल, असे आवाहन विकास सहयोगचे विभागीय समन्वयक विजय कदम यांनी केले. कदम यांनी या शिबिरासाठी विशेष मेहनत घेतली आहे. या बैठकीस पोफळी, कुंभार्ली, पेढे, रेहेळे, अनारी येथील युवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)