शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

येडगेवाडी ग्रामस्थांचे उद्या ‘रास्ता रोको’

By admin | Updated: December 8, 2015 00:38 IST

संगमेश्वर तालुका : आंदोलन काळात गाड्या बंद ठेवण्याची मागणी; वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पामुळे येडगेवाडीतील ग्रामस्थांची वाहतुकीची सुविधा नसल्याने गैरसोय होत आहे. याबाबत प्रशासनाने अनेक वेळा आश्वासने देऊन अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने येडगेवाडी ग्रामस्थ बुधवार, ९ रोजी कुचांबे ते येडगेवाडी या पाटबंधारे विभागाच्या १ किलोमीटर अंतरामध्ये बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. येडगेवाडी ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर सातत्याने चर्चा केली. गेल्या वर्षी मे महिन्यात पाटबंधारे कार्यालय, चिपळूण येथे बेमुदत उपोषण केले होते. आमदार सदानंद चव्हाण यांनी याप्रकरणी मध्यस्थी केल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने या विषयाबाबत ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याशी संपर्क साधला तरीही रस्त्याचे काम व इतर समस्या कायम आहेत. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. हे घटनास्थळी भेट देणार होते. तरीही येथील परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी देण्यात आले. ग्रामस्थांच्या गैरसोयीबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना २६ सप्टेंबर रोजी दिले होते. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही दिली होती. मात्र, याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. या मार्गावर मंगळवार, ८ डिसेंबरपर्यंत तोडगा निघून एस. टी. बस सुरु झाली नाही, तर सर्व ग्रामस्थ एकच निकष असणाऱ्या कुचांबे ते येडगेवाडी या पाटबंधारे विभागाच्या १ किमीमध्ये बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. यादरम्यान एस. टी. महामंडळालाही निवेदन देण्यात आले आहे. एस. टी. बस आंदोलनकर्त्यांपुढे जबरदस्तीने नेऊ नये. आंदोलनादरम्यान एस. टी. बस बंद ठेवण्यात यावी. काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा तुकाराम वि. येडगे, तुकाराम सा. येडगे, अनंत येडगे, संतोष येडगे, लक्ष्मण येडगे, भागोजी झोरे आदी ग्रामस्थांनी दिला आहे. (प्रतिनिधी)