शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

यंदा श्रावण २९ दिवसांचा; मंदिरात प्रवेश मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलपासून लाॅकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर मंदिरेही भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. हिंदू धर्मीयांमध्ये व्रतवैकल्याचा महिना ...

रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलपासून लाॅकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर मंदिरेही भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. हिंदू धर्मीयांमध्ये व्रतवैकल्याचा महिना म्हणून ‘श्रावण’ ओळखला जातो. दर सोमवारी उपवास ठेवल्याने भाविक दर्शनासाठी शिवमंदिरात जातात. परंतु गतवर्षीही कोरोनामुळे मंदिरे बंद होती. यावर्षीही गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे श्रावणात तरी खुली होतील का? यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

दि. ९ ऑगस्टपासून श्रावण सुरू होणार आहे. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवार असून महिनाभरात पाच सोमवार आहेत. एक्का, नामसप्ताहाचे मंदिरातून आयोजन करण्यात येते. गतवर्षी मोजक्या पाच व्यक्तींमध्ये एक्का, जागर, नामसप्ताहासाठी परवानगी देण्यात आली होती. यावर्षी अद्याप परवानगी नाही, मात्र गतवर्षीप्रमाणेच मिळण्याची शक्यता आहे. भाविकांना दर्शनाकरिता प्रवेश बंद असून किमान श्रावणात तरी भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याची मागणी होत आहे.

श्रावणात दर सोमवारी भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे महिनाभरात फुले, हार, नारळ, अगरबत्ती देवासाठी आवर्जून खरेदी करतात. मात्र गतवर्षी श्रावणात मंदिरे बंद होती, शिवाय नऊ महिने मंदिरे बंद असल्याने व्यवसायावर परिणाम झाला होता. यावर्षीही अद्याप मंदिरे बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

- प्रकाश सावंत, व्यावसायिक

व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जाणारा श्रावण दि. ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे मंदिरे अद्याप बंद आहेत. महिनाभर मंदिरात पूजाअर्चा, नामसप्ताह, जागर, एक्का यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली असताना मंदिरे खुली करण्याची मागणी होत आहे.

पूजेचे साहित्य विकून उदरनिर्वाह चालतो. मात्र गेल्या वर्षापासून मंदिरेच बंद असल्याने व्यवसाय बंद आहे. श्रावणात तर मंदिरात एक्का, नामसप्ताहाचे आयोजन केले जात असल्याने भाविकांची वर्दळ सुरू असते. व्यवसाय बऱ्यापैकी होतो, दीड वर्षे व्यवसाय मोडीत निघाला आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- दीक्षा पवार, व्यावसायिक

व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जाणारा श्रावण दि. ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे मंदिरे अद्याप बंद आहेत. महिनाभर मंदिरात पूजाअर्चा, नामसप्ताह, जागर, एक्का यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली असताना मंदिरे खुली करण्याची मागणी होत आहे.