शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी पुढाकार घेऊन राबविली प्लास्टिकमुक्ती मोहीम

By admin | Updated: October 28, 2016 23:43 IST

परिसर स्वच्छतेचा नारा : स्वच्छतेकडून समृद्धीकडे; वेलदूर - नवानगर येथील श्रीराम महिला मंडळाचा आदर्शवत स्तुत्य उपक्रम

असगोली : गुहागर तालुक्यातील वेलदूर - नवानगर येथील श्रीराम महिला मंडळाने नवानगर परिसरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी प्लास्टिक मुक्ती व परिसर स्वच्छतेचा नारा देण्यात आला. या उपक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वेलदूर - नवानगर येथील श्रीराम महिला मंडळाच्यावतीने नवानगर येथील रस्ते, नवानगर मराठी शाळा परिसर, सार्वजनिक पाणीपुरवठा, समुद्रकिनारा या ठिकाणी प्लास्टिकमुक्ती व स्वच्छता करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी कुळ्ये, महिला मंडळाच्या अध्यक्षा विशाखा रोहिलकर, माजी सरपंच नंदकुमार रोहिलकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास धोपावकर, मारुती रोहिलकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, महिला मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्या शैलजा रोहिलकर, प्रिया रोहिलकर, नंदिनी रोहिलकर, सुजाता रोहिलकर, योगिनी तिमसेकर, प्राजक्ता रोहिलकर, माधवी रोहिलकर, दीप्ती रोहिलकर, सुहासिनी कोळथरकर, विनंती रोहिलकर, मयुरी पेवेकर, दक्षता नाटेकर, सुगंधा कोळथरकर, स्नेहल रोहिलकर, शैला जांभारकर, मंगला रोहिलकर, विनंती खडपकर, अक्षया ढोर्लेकर, विजया रोहिलकर, दीक्षा रोहिलकर, प्राजक्ता रोहिलकर, सुनिता खडपकर, नयना रोहिलकर, दीपिका वेलणकर, लता खडपकर, साक्षी रोहिलकर, रामेश्वरी नाटेकर, मनिषा जांभारकर, प्रतीक्षा रोहिलकर, प्रभावती खडपकर, रोशनी रोहिलकर, लता रोहिलकर यांच्यासह महिला मंडळाच्या सर्व सदस्य या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. या अभिनव उपक्रमामुळे स्वच्छ - सुंदर नवानगरच्या वैभवात भर पाडली असून, येथील महिलांनी पुढाकार घेत स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. महिलांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. तसेच महिलांचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असेही आवाहन करण्यात येत आहे. भविष्यात महिला मंडळाच्यावतीने मेणबत्ती प्रशिक्षण, अगरबत्ती प्रशिक्षण, बचतगट आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. याद्वारे महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देतानाच त्यांच्या आर्थिक विकासासाठी मंडळ कार्यरत राहणार असल्याचे अध्यक्षा विशाखा रोहिलकर यांनी सांगितले. (वार्ताहर)