शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सावर्डे गणातील महिला बनताहेत स्वावलंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:34 IST

चिपळूण : महिला बालकल्याण विभागातर्फे प्रशिक्षण कार्यक्रम राबविताना महिलांच्या गरजा, प्रशिक्षणातील आवडीनिवडींना तितकेसे स्थान मिळत नव्हते. मात्र यावेळी माजी ...

चिपळूण : महिला बालकल्याण विभागातर्फे प्रशिक्षण कार्यक्रम राबविताना महिलांच्या गरजा, प्रशिक्षणातील आवडीनिवडींना तितकेसे स्थान मिळत नव्हते. मात्र यावेळी माजी सभापती व विद्यमान सदस्या पूजा निकम यांनी सावर्डे गणात १५ व्या वित्त आयोगातून महिलांच्या गरजेनुसार योजना आखली. त्यासाठी सर्व्हेक्षण करून लाभार्थ्यांची निवड केली. या योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या महिला आता आर्थिकदृष्ट्या समृद्धीकडे वाटचाल करू लागल्या आहेत.

पंचायत समिती महिला बाल कल्याण विभाग, वित्त आयोग निधीतून कधी कधी वस्तूंचा पुरवठा केला जातो; तर कधी विविध बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. तालुक्यासाठी शक्यतो एकच फॉरमॅट ठरलेला असतो. माजी सभापती निकम यांनी वेगळी संकल्पना राबविली. सेस फंडातून सावर्डे गणासाठी मिळणाऱ्या निधीतून त्यांनी स्वतःच योजना तयार केली. संगणक प्रशिक्षण, शिवणकाम, मेहंदी, ब्यूटी पार्लर, विणकाम या प्रशिक्षणासाठी त्यांनी सावर्डे गणातील गरजू महिला प्रशिक्षणार्थीचे सर्व्हेक्षण केले. कोणत्या महिलेस कोणत्या व्यवसायात आवड आहे, याची माहिती घेत आराखडा तयार केला. त्यानुसार महिलांच्या आवडीप्रमाणे प्रशिक्षण दिले.

या प्रशिक्षणासाठी माणदेशी फाऊंडेशनने प्रशिक्षक उपलब्ध करून दिले.

संगणक प्रशिक्षणासाठी बी. एस‌्सी. आयटी सह्याद्री कॉलेजने लॅब उपलब्ध करून दिली; तर टेलरिंग कोर्ससाठी आयटीआय कॉलेजने मशीन दिल्या. मेहंदी, पार्लर प्रशिक्षणासाठी कॉलेजचा हॉल मिळाला. यामुळे १०-१० महिलांची बॅच करून त्यांना सुलभपणे प्रशिक्षण मिळण्यास मदत झाली. सहायक गटविकास अधिकारी अरुण जाधव, विस्तार अधिकारी भास्कर कांबळे, डी. वाय. कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेटी देत प्रशिक्षणाचे कौतुक केले. प्रशिक्षण घेतलेल्या महिलाही आता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय सुरू करू लागल्या आहेत. एखाद्या गणात गरजू महिलांचे सर्व्हेक्षण, त्यांच्या आवडीनिवडी ओळखून तालुक्यात प्रथमच असे प्रशिक्षण दिले जात आहे.