शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये १८ ग्रामपंचायती शौचालयाविना

By admin | Updated: October 13, 2014 23:07 IST

अंमलबजावणीबाबत नाराजी : जिल्ह्यात केवळ दोन तालुके निर्मल

श्रीकांत चाळके - खेड जिल्हाभरात बऱ्याच ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत. मात्र, अशा ग्रामपंचायतींची आकडेवारी काही समाधानकारक नाही. या योजनेची अंमलबजावणी करताना राजकीय हिताकडे पाहिले गेल्याचा आरोप केला जात आहे. जिल्ह्याचे चित्र पाहिले तर ८८ ग्रामपंचायती अद्याप शौचालयाविना आहेत. खेड तालुक्यात १८ ग्रामपंचायतींना अद्याप शौचालये नाहीत. निर्मल ग्राम योजना कशा पध्दतीने राबविली जाते, याचेच हे द्योतक असल्याचे मत ग्रामीण भागात व्यक्त केले जात आहे.खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार वाढलेले असल्याने रोगराईला आमंत्रण मिळत असल्याची टीका केली जात आहे. तरीही वैयक्तिक शौचालयांची आकडेवारी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. जिल्ह्यात २० टक्के कुटुंब अजूनही शौचालयाविना आहेत. ही आकडेवारी ३ लाख ६४ हजार ९८० कुटुंब इतकी आहे. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रूपये अनुदान, तर निर्मल ग्राम योजनेतून १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र, या योजनेचा लाभ किती व कशा प्रकारे घेतला जातो, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात बहुतांश लोकांना या योजनेची माहितीच नसल्याची बाब समोर येत आहे. जिल्ह्यातील गुहागर आणि लांजा हे दोन तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाले आहेत़ त्यामुळे हे दोन्ही तालुके शासन दरबारी निर्मल झाले आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेने २०२२ पर्यंत निर्मल भारत अभियानांअंतर्गत ही शौचालये बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे़ यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून शौचालयाकरिता प्रस्ताव मागविले असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि ग्रामपंचायतीने पाठपुरावा करणे आवश्यक आहे, तरच हे उद्दिष्ट निर्धारित कालावधीत पूर्ण करणे शक्य होईल. जिल्ह्यात दोन तालुके निर्मल. मात्र, खेडची स्थिती गंभीर.हगणदारीमुक्त गाव करण्याचा निर्धार. ग्रामपंचायतींवर अधिक लक्ष. शासनाचे अनुदान मिळाले तरी लाभाचे प्रमाण कमी.स्वच्छ आरोग्य सुंदर शहरासाठी प्रयत्न हवे.काटेकोर अंमलबजावणी गरजेची.