शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सभापती, उपसभापती बदलाचे वारे शमणार?

By admin | Updated: December 3, 2015 23:46 IST

राजापूर पंचायत समिती : पक्षीय बलाचा परिणाम

राजापूर : राजापूर पंचायत समिती वर्तुळात सभापती व उपसभापती बदलाबाबत जोरदार वारे वाहत असले, तरी सत्ताधारी व विरोधक यातील समसमान बलाबल लक्षात घेता सेनेच्या वरिष्ठ स्तरावरुन या बदलाला आवश्यक प्रतिसाद मिळत नसल्याने पदाधिकारी बदलाचे वारे शमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.पुढील सव्वा वर्षासाठी व ऐन निवडणुकांच्या तोंडावर सभापती व उपसभापती बदलाचे फासे मागील वेळेप्रमाणे अनुकूल पडतील याबाबत भविष्य वर्तवणे महाकठीण बनल्यामुळे पंचायत समितीमधील पदाधिकारी बदलाची प्रक्रिया अजून मार्गी लागलेली नाही.राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे सहा, काँग्रेसचे चार आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य आहेत. पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादीने शिवसेनेला साथ देऊन सेनेला सभापतीपद देताना उपसभापतीपद आपल्या पदरात पाडून घेतले होते. मात्र, सभापतीपदाचे आरक्षण बदलताच राष्ट्रवादीने सेनेला दिलेला पाठिंबा मागे घेतला व काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यानंतर सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकात सेना विरुद्ध काँग्रेस आघाडी यांचे समसमान म्हणजे प्रत्येकी सहा सदस्य निवडून आले. मतदानावेळी समान मतदान झाल्याने अखेर चिठ्यांचा प्रयोग करावा लागला होता. त्यामध्ये शिवसेनेचे दोन्ही पदाधिकारी विजयी झाले होते. त्यानुसार सभापती म्हणून सोनम बावकर तर उपसभापतीपदी उमेश पराडकर यांची निवड झाली होती. आता या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कालखंड पूर्ण झाला असल्याने पंचायत समिती वर्तुळात सभापती व उपसभापती बदलाचे वारे घोंगावू लागले आहेत. त्यासाठी सेनेतील इच्छुकांचा गट कार्यरत झाला असून, यावेळी बदल घडवायचाच असा निर्धार त्यांनी केला आहे. मात्र, सातवा सदस्य आपल्या गोटात आणा आणि त्यानंतरच आपण बदल घडवूया असा सबुराचा सल्ला सेनेच्या वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.सातव्या सदस्य आपल्या गोटात आणण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तयारी चालू आहे. एक महिला सदस्य संपर्कात असल्याचे व निवडणुकीवेळी ती सदस्य अनुपस्थित राहिल याचे अभिवचन त्या महिला सदस्याच्या पतीकडून घेण्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाचे संकेत मागील काही दिवसांत मिळत आहेत.यासाठी ३ डिसेंबर रोजी शिवसेनेच्या तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये या विषयावर चर्चा होणार होती. सेनेचे संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार राजन साळवी बैठकीला उपस्थित राहणार होते. तथापि, काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता ही बैठक पुन्हा केव्हा आयोजित केली जाईल व त्यावेळी पदाधिकारी बदलावर चर्चा होईल का याबाबत उत्सुकता आहे. तसेच आता राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार असल्याने आमदार राजन साळवी, नागपूरला रवाना होणार आहेत. त्यामुळे अधिवेशन समाप्तीपर्यंत तरी पदाधिकारी बदलाबाबतचा निर्णय होणे तूर्तास शक्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाचे वारे शमले तर नाही ना, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)देवाचे गोठणेला संधी? : सभापतीपद महिला मागास प्रवर्गासाठीराजापूरचे सभापतीपद महिलांचा मागास प्रवर्ग या गटासाठी आरक्षित असून, शिवसेनेतर्फे सभापतीपदासाठी देवाचे गोठणे विभागाच्या पंचायत समिती सदस्या नलिनी शेलार व उपसभापतीपदासाठी साखरीनाटे गणाचे सदस्य दीपक नागले यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, यावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.अधिवेशन अडसरराज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनासाठी आमदार राजन साळवी नागपूरला रवाना होणार आहेत. अधिवेशन संपेपर्यंत सभापती, उपसभापती निवड होणे शक्य नसल्याने अधिवेशनाचा अडसर या निवड प्रक्रियेला लागणार आहे.