शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीने केले श्रावणाचे स्वागत

By admin | Updated: July 27, 2014 23:03 IST

टॉमेटोचे दर हाताबाहेर : शाकाहार पाळण्याचा ‘धर्म’ खिशाला चाट देणार

रत्नागिरी : श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे श्रावणाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांचे दर वधारले आहेत. ६० ते १२० रूपये किलो दराने भाज्यांची विक्री होत असल्याने यंदा श्रावणात शाकाहार पाळणे म्हणजे खिशाला चाट देणारे ठरणार आहे.श्रावण महिना व्रतवैकल्याचा असून, हिंदू भाविक महिनाभर शाकाहार अवलंबतात. बहुतांश मंडळी उपवास करीत असतात. परंतु भाज्यांचे दर वधारल्यामुळे चार ते सहा माणसांच्या कुटुंबात भाज्या काय पुरविणार, असा प्रश्न गृहिणींना पडू लागला आहे. दररोजच्या जेवणात आवश्यक असणाऱ्या टोमॅटोच्या दराने चांगलीच उचल खाल्ली आहे. ८० ते १०० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू आहे. शिवाय टोमॅटोची प्रतही चांगली नसल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत.आल्याच्या दरानेही मात्र उच्चांक गाठला आहे. १५० ते २०० रूपये किलो दराने आल्याची विक्री सुरू आहे. त्यामुळे जेवणात हिरवा मसाला वापरण्यापूर्वीच ठसका लागण्याची वेळ आली आहे. मिरची ८० ते १०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीर जुडी २० रूपये दराने विकण्यात येत आहे. एरव्ही पाच रूपयांना मिळणारी पुदीनाची जुडी ३० रूपये दराने विकण्यात येत आहे. किरकोळ विक्रेत्यांकडील पुदीना गायब झाला आहे. लसूणसुध्दा ८० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे.सर्वसामान्यांना परवडणारी वांगी ३० ते ४० रूपयांच्या घरात आहेत. दूधी ३० रूपये, कोबी ४० रूपये, तर फ्लॉवर ५० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. सर्व भाज्यांचे दर २५ ते ३० रूपयांच्या घरात स्थिर होते. मात्र, आता तेही वधारले आहेत. गेल्या आठवड्यात फरसबी ८० रूपये किलो दराने विकण्यात येत होती. मात्र, त्यामध्ये घसरण झाली असून, ६० रूपये दराने विकण्यात येत आहे. सिमला मिरची, घेवडा, पावटा ६० रूपये प्रतिकिलो दराने विकण्यात येत आहे. दोडकी, भेंडी, गाजर ६० ते ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे. पावकिलो भाज्यांसाठी २० ते २५ रूपये मोजावे लागत आहेत. बाजारात रानभाज्यांबरोबर गावठी पालेभाज्यांही उपलब्ध आहेत. माठ, मेथी, पालक, मूळा, शेपू आदी भाज्यांच्या जुड्या १० ते १५ रूपये प्रतिनग दराने विकण्यात येत आहेत.कांदा २५ ते ३० रूपये किलो, तर बटाटा ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. काकडी, बीट ३५ ते ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. मुस्लिम बांधवांचा रमजान संपत आला असून, ईद तोंडावर आली आहे. ईदसाठी हिरवा मसाला, टोमॅटो कांदा, बटाटा, काकडी, गाजर, बीट, लिंबूला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, दरामुळे ग्राहक हैराण होत आहेत.(प्रतिनिधी)