शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

हम होंगे कामयाब... मन में है विश्‍वास. . !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : ‘हम होंगे कामयाब... मन में है विश्‍वास.. पुरा है विश्‍वास..!’ असा आत्मविश्वासपूर्ण आवाज रायपाटणच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : ‘हम होंगे कामयाब... मन में है विश्‍वास.. पुरा है विश्‍वास..!’ असा आत्मविश्वासपूर्ण आवाज रायपाटणच्या कोविड केअर सेंटरमध्ये घुमला. रुग्ण, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या या एकत्रित आवाजाने उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांत निश्‍चितच सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असणार. निमित्त होते रत्नागिरीचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्णा पेवेकर यांच्या समुपदेशनाचे.

रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानणारे काही डॉक्टर्स देव म्हणून जनतेनेच स्वीकारलेले असतात. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पेवेकर यांच्या बाबतीतील असाच अनुभव रायपाटण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांनी अनुभवला. या रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वेच्छेने डॉ. पेवेकर रत्नागिरीतून तेथे पोहोचले होते.

रायपाटण येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मानसिक समस्या जाणून घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या ताणतणावाचे नियोजन कसे करावे, सकारात्मकता कशी वाढवावी, याबद्दल डॉ. पेवेकर यांनी दीर्घकाळ समुपदेशन केले.

तणावमुक्‍ती कशी साधावी यांचे विश्लेषणही डाॅ. पेवेकर यांनी केले.

बऱ्याचदा आपण नकारात्मक विचार करीत असतो. त्याचा तसाच परिणाम आपल्या दृष्टिकोनातून व शारीरिक किंवा मानसिक व्याधीतून दिसून येतो. म्हणूनच सकारात्मक, सद्सद्‌विवेक विचार ‘सेल्फ ऑफर्मेशन’ या तंत्राने कसे करायचे हे डॉ. पेवेकर यांनी प्रत्यक्ष दाखविले व सगळ्यांकडून करवून घेतले.

कोविड रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, फ्रंटलाईन वर्कर्स, कोविड पश्‍चात व्यक्‍ती यांना मानसिक आधार, समुपदेशन करण्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील मानसिक आरोग्य व्यावसायिक एकत्र येऊन ‘सुकून’ हा प्रकल्प जिल्हाभर राबविणार आहेत. डॉ. कृष्णा पेवेकर यांचे मार्गदर्शन हा सुद्धा याचाच एक भाग होता. या उपक्रमाला तहसीलदार प्रतिभा वराळे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे, रायपाटणचे वैद्यकीय अधिकारी, तलाठी गुरव, मंडल अधिकारी राईन यांचे यासाठी सहकार्य लाभले.

----------------------

रुग्णांना मानसिक आधार

कोविडच्या दुसऱ्या लाटेची गंभीरता व भयानकता आपण सारे जवळून पाहत आहोत. कोरोनाने आता अनेकांचे आप्त, कुटुंबीय, नातेवाइकांचे बळी घेण्याच्या दुःखद घटना घडत आहेत. त्यात प्रत्यक्ष रुग्णांच्या यातना तीव्र आढळतात. एकंदरीत सगळाच दृष्टिकोन नकारात्मक होऊन जातो. त्याचे पडसाद हे प्रतिकार शक्‍ती, बरी होण्याची प्रक्रिया, आजारापश्‍चात उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांमध्ये दिसून येतात. तणाव, चिंता, भीती का उद्‌भवतात, मेंदू व मेंदूतील रसायनांचा त्यांच्याशी काय संबंध असतो हे डॉ. पेवेकर यांनी समजावून सांगितले.