शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीपेक्षा पाणीटंचाई तीव्र

By admin | Updated: April 24, 2016 00:40 IST

कमी पावसाचे दुष्परिणाम : टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या ६० वर; पाण्यासाठी वणवण सुरू

रत्नागिरी : कमी पाऊस पडल्याचे दुष्परिणाम ऐन उन्हाळ्यात जाणवत असून, आज जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील ३४ गावांमधील ६० वाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. आजची पाणीटंचाई गतवर्षीच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. उन्हाळा सुरु असला तरी गेल्या काही वर्षांपेक्षा यावर्षीचा उन्हाळा कडक असल्याचे जाणवत आहे. विहिरी, नाले, तलाव, आदी पाण्याचे स्रोत आटत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढण्याची चिन्हे असल्याने भयंकर उकाडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाण्याचे बाष्पीभवन जलदगतीने होत असून, जमिनीत पाणी झिरपण्याची प्रक्रिया झपाट्याने होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील २२ गावांमधील ३६ वाड्यांमध्ये पाणीटंचाई होती़ या टंचाईग्रस्तांना ६ शासकीय आणि ३ खासगी टँकर्स अशा एकूण ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामध्ये आता १२ गावांमधील २४ वाड्यांची भर पडली आहे़ या टंचाईग्रस्तांना शासकीय ८ आणि खासगी २ अशा एकूण १० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रशासनाकडून टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे़ मात्र, प्रत्यक्षात त्यांना दोन ते चार दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ यामुळे टंचाईग्रस्तांचे पाण्यासाठी हाल होत आहेत़ दिवसेंदिवस या पाणीटंचाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)दापोलीत १५ गावांना पाणीटंचाईच्या झळा!दापोली : दापोलीतील पंधरा गावांना पाणीटंचाई जाणवू लागल्याने येथून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली असून, देवाचा डोंगर येथे मात्र मार्च महिण्यापासूनच टँकर धावू लागला आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने तालुक्यातील पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे. तसेच उन्हाचा कडाका देखील दिवसेंदिवस वाढत चालला असून, दापोलीतील काही गावांमधील पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मार्च महिन्यापासूनच जामगे देवाचा डोंगर व मंडणगड मधील भोलवली देवाचा डोंगर येथे पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. परंतु, उन्हाचा कडाका पाहता भविष्यातील पाणीटंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे. आंजर्ले, ओनणवसे, मुर्डी, उंबरशेत, नवसे, केळशी, उटंबर, आतगाव, कौडोली, रावतोली, चिखलगाव, शिरखळ, उन्हवरे, फरारे, उंबर्ले या गावांमध्ये पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे. या गावांची पाहणी देखील करण्यात आली असून, लवकरच या ठिकाणी पाण्याचे टँकर पाठविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)