शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जलतरंगावर उमटली टंचाईची दाहकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 00:24 IST

समुद्रात जाऊन मासे पकडणे, किनाऱ्यावर आल्यानंतर मासळीच्या विक्रीची व्यवस्था करणे यातच गुंतून पडणाऱ्या मच्छीमारांसाठी गेली काही वर्षे हा उपक्रम सातत्याने साजरा होत आहे

रत्नागिरी : डोक्याला मुंडावळ्या आणि कमरेवर कळशी घेतलेली नवी नवरी... मासळीचा दुष्काळ... पाणी वाचवा अभियान... व्यसनमुक्ती.. महिला मच्छीमार यासारख्या अनेक विषयांमधून मच्छीमारांनी आपल्या सामाजिक जाणिवेचे उत्कृष्ट दर्शन घडवले. निमित्त होते फॅन्सी नौका जनजागरण स्पर्धेचे! कमरेवर कळशी घेऊन जाणाऱ्या नव्या नवरीच्या माध्यमातून पाणीटंचाईची दाहकता मांडणाऱ्या जलबिंदू क्रिएशनच्या नौकेने प्रथम क्रमांक मिळवला.समुद्रात जाऊन मासे पकडणे, किनाऱ्यावर आल्यानंतर मासळीच्या विक्रीची व्यवस्था करणे यातच गुंतून पडणाऱ्या मच्छीमारांसाठी गेली काही वर्षे हा उपक्रम सातत्याने साजरा होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, आध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आभार सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ, रत्नागिरी व प्रवासधारा, मुंबई यांच्यावतीने गावडे आंबेरे-हनुमानवाडी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त ही ‘फिनोलेक्स चषक फॅन्सी नौका जनजागरण स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. त्याला मच्छीमारांनी भरभरून प्रतिसाद दिला.मुचकुंदी नदी व पूर्णगड खाडीमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये नौकांवर विविध देखावे करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जलबिंदू क्रिएशनने पटकावला. त्यांना तीन हजार रुपये व फिनोलेक्स चषक देऊन गौरवण्यात आले. अतिरिक्त मच्छीमारीमुळे माशांच्या जाती नष्ट होत आहेत. अशाच पध्दतीने मासेमारी सुरू राहिली, तर भविष्यात २०५०मध्ये मासे पूर्णपणे नष्ट होतील, असा संदेश देणाऱ्या मत्स्य महाविद्यालय, शिरगावला द्वितीय क्रमांक मिळाला. विजेत्याला रोख दोन हजार रुपये व फिनोलेक्स चषक देऊन गौरविण्यात आले. पर्ससीन नेटवरील बंदीमुळे सध्या मासेमारी बंद आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर मासेमारी झाल्याने सध्या मत्स्य दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात काहीही सापडत नसल्याचे विदारक चित्र ‘शिवसागर मच्छिमार सोसायटीेने देखाव्यातून मांडले होते. या देखाव्याला तृतीय क्रमांक मिळाला असून, एक हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.विविध क्षेत्र महिलांनी पादाक्रांत केली आहेत. मच्छीमार कुटुंबातील पुरूषानी मासेमारी केल्यानंतर विक्रीचे काम स्त्रिया करतात. परंतु आज स्त्रिया या क्षेत्रातही मागे राहिलेल्या नाहीत. समुद्रात जाळे टाकून मासेमारी करणाऱ्या महिला असे दोन देखावे विठ्ठल रखुमाई मंडळाने मांडले होते. या मंडळास उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला आहे. व्यसनाधिनतेमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. त्यामुळे व्यसनमुक्ती झालीच पाहिजे, असा संदेश प्रवासधारा ग्रुपने मांडलेल्या देखाव्यातून देण्यात आला. या गटालाही उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. उत्तेजनार्थ दोन क्रमांकाला ५०० रुपयांची बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. आशिष मोहिते व डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)