शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

पाणीवापर संस्थांची ११ वर्षे प्रतीक्षा

By admin | Updated: April 7, 2016 23:59 IST

खेड तालुक्यातील परिस्थिती : नातूवाडी प्रकल्पाच्या उपअभियंत्यांची कबुली

श्रीकांत चाळके -- खेड --खेड तालुक्यातील धरण हद्दीमध्ये अद्याप पाणीवापर संस्थाच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ ११ वर्ष लोटली तरीही या धरण हद्दीमध्ये एकही पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आली नसल्याचे नूतन उपअभियंता मंगले यांनी सांगितले. आम्ही लवकरच या संस्था स्थापन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.धरण हद्दीतील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली येण्यासाठी आणि त्या दृष्टीने स्वतंत्र एजन्सी म्हणून राज्य सरकारने २००५ मध्ये केलेल्या सिंचन व्यवस्थापन कायद्यांतर्गत या समित्यांची स्थापना करण्यास अनुमती दिली आहे़ मात्र, यावर ११ वर्षे उलटून गेली तरीही खेड तालुक्यातील धरण हद्दीत पाणीवापर संस्था कार्यरत नसल्याचेच उपअभियंत्यांच्या खुलाशाने समोर आले आहे. काही संस्थांचा अपवाद वगळता अनेक संस्था आजही केवळ कागदावर असल्याचे यातून समोर आले आहे़ अस्तित्वात असलेल्या संस्था या केवळ नावापुरत्या असून, संस्थेच्या बैठकाही अपवादात्मक परिस्थितीत घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.़ महत्वाचे निर्णय घेताना धरण प्रशासन अशा संस्थांना विश्वासात घेत नसल्याने या संस्था केवळ नामधारी असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे़ राज्य सरकारने लागू केलेला सिंचन व्यवस्थापन कायदा हा सर्वच पाटबंधारे प्रकल्पांना लागू करण्यात आला आहे़ खेड तालुक्यातील सात धरणांच्या हद्दीत या पाणीवापर संस्था स्थापन करणे आवश्यक होते.़ विशेषत: शिरवली येथील धरण हद्दीत ५ वर्षापूर्वी एकमेव अशी पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आली आहे़ या धरणाच्या हद्दीत ३ गावांचा समावेश असून, येथील शेकडो एकर जमीन ही ओलिताखाली आहे़ मात्र, या धरणाचे दोन्ही कालवे नादुरूस्त असल्याने या समितीचे कामकाज जवळपास बंदच आहे़ सध्या या कालव्यांचे काम सुरू असल्याने ते पूर्ण झाल्यानंतर सिंचनाचे काम या समितीकडे सोपवण्यात येणार आहे़ तसेच ही समिती स्थापन झाल्यांनतर ३ वर्षे या समितीची एकही बैठक झालेली नाही़ याविषयी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने समितीची बैठक होऊ शकली नसल्याचे सांगण्यात आले. खोपी आणि कोंडीवली धरण हद्दीत अद्याप अशा समित्यांची स्थापना करण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे़ मुबलक पाणीसाठा असूनही या दोन्ही धरणातील पाण्याचा सिंचनासाठी वापर होत नाही़ त्यामुळे या समित्या कधी स्थापन करणार आणि त्यानंतर पाण्याचा सिंचनासाठी केव्हा आणि कोठे वापर करणार याविषयी नि:संदिग्ध माहिती मिळत नाही़ पाण्याचा साठा असलेल्या धरण हद्दीत निधी मंजूर झाल्यानंतर काम हाती घेण्यासाठी प्रती ५०० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणी संस्था स्थापण करणे गरजेचे आहे़ अशा ५ संस्था स्थापन करण्यात येणार आहेत़ येथील उजव्या कालव्याच्या क्षेत्रात तीन आणि डाव्या कालव्याच्या क्षेत्रात दोन संस्था स्थापन करण्यात येणार आहेत़ याच संस्था पाण्याचे सिंचन व्यवस्थापन करणार असल्याची माहिती मिळाली आहे़ मात्र, अद्याप या संस्था स्थापन झालेल्या नाहीत. या संस्था स्थापन करण्यासाठी संबंधित अधिकारीच उदासीन असल्याचे दिसून येत आहे़ पाण्याची सिंचन क्षमता पूर्ण करण्यासाठी माणी- शेलारवाडी, पोयनार, न्यू मांडवे या धरणांचे काम अद्याप प्रगतीपथावर आहे़ या धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याशिवाय येथील पाणी सिंचनाकरिता वापरण्यात येणार नाही़ नातूवाडी धरण हद्दीतील १८ लाभक्षेत्र गावात व वाडीत जनजागृती मोहीम राबविण्यात येते़ येथील १८ गावांमधून नोव्हेंबर २०१२मध्ये पाच पाणीवापर संस्था स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती़ मात्र, ११ वर्षे लोटली तरीही या संस्था स्थापन करण्यात आल्या नसून, त्यांची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना त्रासदायक : उत्सुकता कमीपाणीवापर संस्था ग्रामसभेमध्ये स्थापन करण्यात येतात़ यावेळी सर्वसंमतीने ९ सदस्यांची निवड केली जाते़ यातील एका जरी सदस्याला विरोध झाला तरी संस्थेचे कामकाज बंद पडणार आहे़ त्यामुळे अधिकाऱ्यांनाही ते त्रासदायक ठरणार असल्याने या समित्या स्थापन करण्याच्या कामात कोणीही उत्सुक नसल्याचेच दिसून येत आहे़ सिंचनाचा प्रश्नसमित्या गठीत झाल्या नसल्याने धरणातील पाण्याचे वितरण कामात देखील अडचणी उद्भवणार आहेत़ संस्था नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे़