शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरट्यास अटक-सात वाहने जप्त

By admin | Updated: September 1, 2014 23:03 IST

भंगारातील गाड्यांचे क्रमांक चोरींच्या गाड्यांना

रत्नागिरी : जुन्या गाड्या कमी दराने विकत घ्यायच्या. त्या भंगारात विकून त्यांचा नंबर व कागदपत्रे चोरलेल्या गाड्यांना मिळवून घ्यायची आणि चोरीच्या गाड्या राजरोसपणे रस्त्यावर आणायच्या, असा चोरट्यांचा नवा फंडा रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी आतिक खलिक मस्तान (वय २६, रा. साखरीनाटे, राजापूर) याला अटक केली असून, चोरलेल्या पाच सुमो गाड्या आणि सुमोचे एक इंजिन तसेच एक पल्सर, एक अ‍ॅक्टिव्हा असा त्यांच्याकडील २२ लाख ७० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साखरी नाटे येथे राहणारा आतिक मस्तान हा वारंवार बाहेरून गाड्या आणत असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने नाटे येथे आतिक राहत असलेल्या गाझी मोहल्यात जाऊन त्याच्याकडील गाड्यांची खात्री केली असता गाडीवर असलेले नंबर, इंजिन नंबर, चेसीस नंबर व कागदपत्र यामध्ये तफावत असल्याचे दिसून आले. त्याबाबत सखोल तपास करता त्याच्याकडून भयानक सत्य बाहेर आले. जुन्या गाड्या भंगारात विकून त्या गाड्यांचे नंबर्स व कागदपत्रांचा वापर चोरीच्या गाड्यांना वापरण्याची नवीन पद्धत अवलंबिल्याची कबुली त्याने दिली.आतिकने एमएच ०१ टी ७३९७ या क्रमांकाची सुमो गाडी भालावली येथून व एमएच ०३ एच ३४२६ या क्रमांकाची सुमो मुंबईहून खरेदी केली. या दोन्ही गाड्या त्याने भंगारात विकल्या. यादरम्यान निपाणी-बेळगाव येथून एमएच १२ डीएम १०२८ व केए २२ बी ५०७३ या दोन सुमो चोरून आणल्या होत्या. या चोरीच्या गाड्यांना त्यांना भंगारात विकलेल्या दोन सुमोंच्या नंबरप्लेट वापरल्या. तशी कागदपत्रेही त्याने करून घेतली. तसेच गाडी क्र. एमएच ०८ सी ८६४८ विकत घेऊन त्या गाडीचे इंजिन, (पान १ वरून) चेसी व बॉडी हे इतर गाडी व्यावसायिकांना विकले आणि त्या गाडीची नंबरप्लेट व कागदपत्र हे चोरून आणलेल्या दुसऱ्या गाडीला वापरले.आरोपींच्या घराशेजारी एका गाडीचे इंजिन व चेसी काढून ठेवलेली आढळली. (पान १० वर)