शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी समर्थनार्थ पाचल ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST

राजापूर : रिफायनरी प्रकल्प कोकणात राहणार की विदर्भात जाणार या विषयावरून दोन दिवस जोरदार मंथन सुरू असतानाच प्रस्तावित ...

राजापूर : रिफायनरी प्रकल्प कोकणात राहणार की विदर्भात जाणार या विषयावरून दोन दिवस जोरदार मंथन सुरू असतानाच प्रस्तावित रिफायनरीच्या समर्थनार्थ आता प्रकल्प क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायती पुढे सरसावल्या आहेत. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाचलने रिफायनरीच्या समर्थनाचा एकमुखी ठराव मंजूर करून तालुक्यातच प्रकल्प राहावा, अशी मागणी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांत उठावदार कामगिरी करताना शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पाचल ग्रामपंचायतीने राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ एकमुखी ठराव केला आहे. मंगळवारी (दि. २९) पाचल ग्रामपंचायतीच्या बैठकीत तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा मुद्दा चर्चेत आला. कोविडमुळे निर्माण झालेला रोजगारीचा प्रश्न पाहता रिफायनरी प्रकल्प होणे ही काळाची गरज असून, त्याच्या समर्थनाचा ठराव पाचलचे उपसरपंच किशोर नारकर यांनी मांडला. त्याला पाचलचे ज्येष्ठ सदस्य शंकर ऊर्फ अण्णा पाथरे यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी उपस्थित असलेल्या सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मत व्यक्त केले आणि एकमताने प्रस्तावित रिफायनरीचा ठराव मंजूर झाला.

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी आता राजापूर तालुक्यात जनजागृती होऊ लागली असून, प्रकल्प मार्गी लागावा म्हणून ठरावही करण्याचा निर्णय विविध ग्रामपंचायतींनी घेतल्याचे समजते.

चौकट

कोविडच्या महामारीमुळे रोजगारीबाबत निर्माण झालेली परिस्थिती, प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रोजगारासाठी उपयुक्त ठरणारा आहे. शिवाय तालुक्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. त्याचा विचार करून आम्ही रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारा ठराव मंजूर केला आहे.

- शंकर ऊर्फ अण्णा पाथरे, ग्रामपंचायत सदस्य, पाचल