शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी अपघातात म्हाप्रळचे दोघे ठार

By admin | Updated: July 14, 2016 00:38 IST

माणगाव येथील दुर्घटना : कारची कंटेनरला जोरदार धडक

मंडणगड : माणगाव (रायगड) येथून वैद्यकीय उपचार करून म्हाप्रळ येथे परतीचा प्रवास करणाऱ्या हुसेन इब्राहीम मुकादम (वय ७0) यांच्या स्वीफ्ट कारने एस.टीलला ओव्हर टेक करताना मुंबईहून येणाऱ्या कंटेनरला जोराची धडक दिली. या अपघातात हुसेन यांच्यासह त्यांची भाची आयेशा मुकादम (६0) जागीच ठार झाली. यात हुसेन यांची बहीण कुशीद अब्दुल्ला मुकादम (८0) या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर, एसटीला रस्त्याच्या बाजूच्या गटारात किरकोळ अपघात झाला. बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास लोणोरे रेपोशी फाटा येथे हा अपघात घडला. कुशीद मुकादम यांच्यावर प्रथम माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. या अपघातासंदर्भात माणगाव पोलिसस्थानकातून व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, हुसेन मुकादम स्वीफ्ट डिझायर (एमएच ०८ बी २५०९) गाडीने बहीण व भाचीसमवेत माणगाव येथे आपल्या तब्येतीची तपासणी करण्यासाठी गेले होते. तेथील कामे आटोपून माणगाव येथून म्हाप्रळकडे परतीचा प्रवास करीत होते. सकाळी ८.३० च्या दरम्यान लोणेरे रोपोली फाटा येथे दापोली-मुंबई एसटीला (एमएच २० बीएल ३२६७) ओव्हरटेक करून मुंबईकडून गोव्याला जात असलेल्या कंटेनरला मुकादम यांच्या कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात हुसेन मुकादम, आयेशा मुकादम जाग्यावरच गतप्राण झाले, तर मुकादम यांची बहीण कुशीद या गंभीर जखमी झाल्या. गोरेगाव पोलिस स्थानकात दापोली-मुंबई गाडीचे वाहक अमित नंदकुमार साळवी (खेर्डी, दापोली) यांनी फिर्याद नोंदवली आहे. अधिक तपास पोलिस नाईक संतोष वळंजू करीत आहेत. (प्रतिनिधी)