शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात दोन लाखांची वृक्षलागवड

By admin | Updated: July 6, 2016 00:34 IST

शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती : सामाजिक संस्थांचाही उल्लेखनीय सहभाग

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असतानाच रत्नागिरी जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे, किंबहुना अधिकच वृक्षलागवड करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण, वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था यांच्यातर्फे जिल्ह्यात २ लाख ४ हजार ९७५ वृक्षलागवड पूर्ण करण्यात आली आहे.सुरुवातीला जिल्ह्यास १ लाख ६४ हजार १८ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आॅनलाईन पद्धतीने नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ९२ हजार ४७९ वृक्षलागवडचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले. आॅनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली होती. त्यानुसार १ लाख ८६ हजार ५५० झाडे लावण्यात आली आहेत, तर आॅफलाईन पद्धतीने १८ हजार ४२५ झाडे लावण्यात आली. जिल्हाभरात एकूण २ लाख ४ हजार ९७५ झाडांची लागवड करण्यात आली. त्यासाठी १ लाख ५३ हजार ५२ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.संपूर्ण जिल्हाभरात चिपळूण तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३१ हजार ८४८ झाडे लावण्यात आली. त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात २६ हजार ३४५, लांजा तालुक्यात २४ हजार ७०१ वृक्षलागवड करण्यात आली. अनेक व्यक्ती झाडे लावण्यासाठी स्वत:हून पुढे आल्या आहेत. इमारतीमध्ये राहणाऱ्या मंडळींनी तर कुंड्यांमध्ये झाडे लावली.विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांनीदेखील वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आॅनलाईन पद्धतीने लागवडीचा डेटा ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे आॅफलाईन पद्धतीने लागवड करणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. संगमेश्वर तालुकावगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये आॅफलाईन लागवड करण्यात आली. अन्य तालुक्यांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड करण्यात आली आहे. वृक्षलागवडीचा हा उपक्रम अजूनही सुरुच आहे. (प्रतिनिधी)वृक्षलागवडीचे हे शिवधनुष्य विविध शासकीय कर्मचाऱ्यांनी संस्था, स्थानिक ग्रामस्थ तसेच नागरिकांच्या सहभागातून यशस्वीपणे पेलले. त्यामुळेच जिल्ेह्यात १०० टक्के वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.